केंदूरमध्ये लाडू वाटून तर करंदीत फटाके फोडून आनंद साजरा

Image may contain: 12 people, people smiling, people standing and wedding
करंदी, ता. 24 मे 2019 (विशाल वर्पे) : केंदूर आणि करंदीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अमोल कोल्हे विजयी झाल्यानंतर लाडू वाटून आणि फाट्याक्याची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला आहे.
 
करंदीमध्ये ७३२ तर केंदूरमध्ये १६९२ मतांची अमोल कोल्हेंना आघाडी मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकाच जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. शिरूर लोकसभा मतदार संघाची पुनररचना झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत या दोन्ही गावात पहिल्यांदा एवढं मताधिक्य मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहायला मिळते मात्र नेहमीच शिवसेनेचे खासदार निवडून का येतात ही सल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मनात होती. मात्र, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बनविण्यात केंदूर आणि करंदीचा मोठा वाटा असल्याच्या भावना ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या.

ठरवल्या प्रमाणे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांना मताधिक्य देऊ शकलो, अशी भावना यावेळी विकास दरेकर यांनी व्यक्त केली. यावेळी करंदीमध्ये शंकर जांभळकर, विकास दरेकर, बबलू ढोकले, ग्रामपंचायत सदस्य नितीन कदम, दीपक खेडकर, संतोष खेडकर, नितीन गवळी, बाबाजी कंद्रुप, बाबाजी नप्ते, यांनी जल्लोष केला तर केंदूरमध्ये सूर्यकांत थिटे, तुकाराम थिटे, गोरक्ष थिटे, रामभाऊ साकोरे, अभिजित साकोरे, भाऊसाहेब थिटे, शहाजी सुक्रे, दत्तोबा ताठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या