गणेगावमध्ये विहिरीत क्रेन कोसळून दोघांचा मृत्यू

Image may contain: one or more people, sky and outdoor
गणेगाव खालसा, ता. 25 मे 2019 : येथील एका विहिरीतील खोदाई करताना क्रेन खाली कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये एक गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विहिरीमध्ये क्रेन कोसळून शरद शिवा शिंदे (वय 21) व अंजली शरद शिंदे (वय 19) (दोघेही सध्या रा. पिंपळे खालसा, मूळ रा. अंतरवळी टेंभी, ता. घनसांगवी, जि. जालना) या दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात भारत शिवा शिंदे (वय 20) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शिवा शंकर शिंदे यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस चौकीत तक्रार दिली आहे.

विहिरीची खोदाई करताना क्रेन चालविताना सुरक्षेचे उपाय न करता हलगर्जीपणामुळे खोदाई कामातील क्रेन विहिरीत कोसळून अपघात घडला. याप्रकरणी आरोपी शंकर ज्ञानेश्वर धुमाळ (सध्या रा. पिंपळे खालसा, ता. शिरूर) यांच्यावर रांजणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या