कर्डे येथे अनैतिक संबंधाच्या कारणावरून ज्येष्ठाचा खून

No photo description available.
शिरूर, ता. 25 मे 2019: कर्डे (ता. शिरूर) येथे अनैतिक संबंधाच्या कारणावरून शिवाजी बाळासाहेब कुलाळ (वय 65, रा. अनोसेवाडी, ता. शिरूर) यांचा लोखंडी पहारीने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी (ता. 24) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.

शिवाजी कुलाळ यांचा मुलगा संभाजी कुलाळ यांनी याबाबतची तक्रार शिरूर पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी सुनीता पोपट लोखंडे (वय 55, रा. कर्डे, ता. शिरूर) हिच्यासह दोन ते तीन अज्ञात (नाव व पत्ता समजू शकले नाही) हल्लेखोरांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलाळ हे गुरुवारी (ता. 23) एका नातेवाइकाच्या लग्नासाठी बेलवंडी फाटा येथे गेले होते. तेथून घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने रात्री आठच्या दरम्यान, त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास कर्डे येथील कैलास वाळके यांनी संभाजी कुलाळ याच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. "तुझ्या वडिलांना मार लागला आहे. तू लवकर ये' असे सांगितल्याने तो नातेवाइकांसह कर्डे येथे आला. त्या वेळी सुनीता लोखंडे यांच्या घरात शिवाजी कुलाळ हे मृतावस्थेत आढळले. त्यांच्यावर कठीण वस्तूने मारहाण केल्याच्या जखमा होत्या. पोलिसांनी सुनीता लोखंडे हिच्यासह दोन ते तीन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या