नवीन वीज जोड देण्याची मागणी; कर्मचारी मालामाल

No photo description available.
शिरूर, ता. 27 मे 2019 : शिरूर तालुक्यात विज वितरण कार्यालयात शेतीपंपासाठी नवीन वीज जोडणी कनेक्शन घेण्यासाठी कोटेशन बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये वीज वितरणच्या कारभाराविषयी मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. नवीन कोटेशन घेणे बंद असल्याने विद्यूत कंपनीचे देखील लाखो रुपयाचे यामध्ये नुकसान आहे. त्यामुळे नवीन कृषी वीज जोडणी कनेक्शन सुरु करण्याची मागणी शेतकरी कृती समीतीचे उमेश काळे यांनी केली आहे.

शिरूर तालुक्यातील विद्यूत वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे शेतकऱ्यांना नवीन विज जोडणीसाठी लागणारे साहित्य गेल्या अनेक महिन्यापासून उपलब्ध नाही. तसेच कोटेशनही भरून घेतले जात नाही. १८ मार्च २०१८ पासून ही संपूर्ण प्रक्रिया बंद आहे. 'महावितरण आपल्या दारी' या शासनाच्या उपक्रमात अनेक शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेले असताना सुद्धा त्याचे नाव यादीत आले नाही.

महावितरणच्या एचओडीएस योजनेत अनेक ग्राहकांनी सहभाग घेतला असून ती कामे संत गतीने चालू आहेत. यंदा दुष्काळामुळे पाण्याचे स्त्रोत असावेत म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेतात नव्याने खणलेल्या विहीरी, बोअरवेल, तसेच नदीकाठी बसविण्यात येणारे पंप हि कामे शेतकऱ्यांनी केली आहेत. परंतु महावितरण विभागाने क्रुषीपंपाचे कोटेशन बंद केले आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यात हीच अवस्था आहे. बऱ्याच ठिकाणी पूर्वीचे मीटर नादुरुस्त झाले आहेत त्या ठिकाणी नवीन मिटर बसवलेले नाहीत, ज्या क्रमाने विज मागणी अर्ज येतात त्या क्रमाने मंजुरी मिळत नाही, ट्रान्सफार्ममर जळाल्यास विहीत मुदतीत मिळत नाही, अ १ फॉर्म सहीत तक्रार अर्जाचे नमुने कार्यालयात उपलब्ध नाहीत. महावितरणच्या अशा गलथान कारभाराचा फटका ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे विज जोडणीपासून वंचित राहण्याची वेळ बऱ्याच शेतकऱ्यावर आली आहे. नवीन विजजोडणी न दिल्याने विज वितरण कंपनीचे लाखोरुपयाचे नुकसान होत आहे. नवीन विजजोडणी कधी सुरू होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. या विषयीचे निवेदन मुख्य अभियंता तसेच उर्जा मंत्री याना भेटुन देणार असल्याचेही काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

महावितरणचे कर्मचारी मालामाल...
शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये महावितरणचे कर्मचारी नागरिकांकडून पैसे उकळत असल्याची चर्चा आहे. ठिकठिकाणी विहीरींची कामे सुरू आहेत. विहीरीमधील पाणी बाहेर काढण्यासाठी आकडे टाकले जातात. संबंधित ठिकाणी तत्काळ कर्मचारी जाऊन पैसे उकळतात. मात्र, नवीन जोडणीसाठी विलंब लावतात, अशा तक्रारी पुढे येत आहेत. यामुळे महावितरणचे नुकसान होत असून, दुसरीकडे मात्र कर्मचारी मालामाल होत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या