HSC Result : बारावीचा निकाल आज, पाहा या साईटवर

पुणे, ता. 28 मे 2019 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज (मंगळवार) जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

बोर्डाने फेब्रुवारी 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे ही परीक्षा घेण्यात आली होती. मागच्या वर्षी बारावी बोर्डाचा निकाल 30 मे रोजी लागला होता. मात्र यंदा दोन दिवस अगोदरच बारावीचा निकाल विद्यार्थ्यांच्या हाती मिळाला होता.

दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात
बारावीचा निकाल आज लागल्यानंतर दहावीचाही निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. मात्र, बोर्डाकडून याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. निकालाआधी एक किंवा दोन दिवस अगोदर निकालाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

याठिकाणी पाहता येणार निकाल

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या