शिरूर तालुक्याचा बारावीचा निकाल 90 टक्के

Image may contain: 6 people, people smiling, people standingशिरूर, ता. 29 मे 2019: शिरूर तालुक्याचा बारावीचा निकाल 90 टक्के लागला असून 5 हजार 308 पैकी 4 हजार 775 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील 2 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

20 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 90 टक्केच्या पुढे असून, तालुक्याने उत्कॄष्ठ निकालाची परंपरा कायम राखली आहे. शिरूर तालुक्‍याने शेकडा निकालात सातत्य राखले असले तरी विद्यार्थ्यांच्या एकूण गुणवत्तेत मात्र घट झाल्याचे दिसते. शास्त्र शाखेतील गुणवत्ता घट चिंतेची बाब आहे.

शिरूर तालुक्यातील शाळांचा शेकडा निकाल पुढीलप्रमाणे :
सी.टी.बोरा कॉलेज शिरूर (89.77), विद्याधाम प्रशाला शिरूर (99.21), विद्याधाम प्रशाला शिक्रापूर (89.15), श्री भैरवनाथ विद्यालय पाबळ (91.45), स्वा. सैनिक आर.बी.गुजर प्रशाला तळेगाव ढमढेरे (91.82), न्यू इंग्लिश स्कूल शिरूर (96.12), छत्रपती उच्च माध्य. विद्यालय वडगाव रासाई (82.27), श्री मल्लिकार्जुन उच्च माध्यमिक विद्यालय न्हावरे (96.64), सरदार रघुनाथराव ढवळे ज्यु.कॉलेज केंदूर (93.33), श्री बापूसाहेब गावडे ज्यु. कॉलेज टाकळी हाजी (88.77), श्री वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा (90.53), विद्या विकास मंदिर निमगाव म्हाळुंगी (69.23), श्री भैरवनाथ विद्यालय करडे (81.57),  विद्याधाम प्रशाला कान्हूर मेसार्इ (77.77), श्री दत्त विद्यालय पिंपरखेड (93.75),  न्यू इंग्लिश स्कूल मलठण (80.32), न्यू इंग्लिश स्कूल कवठे यमाई (54.34), श्री संभाजीराजे ज्यु. कॉलेज जातेगाव बुद्रुक (96.78), छत्रपती संभाजी हायस्कूल कोरेगाव भीमा (60.41), सौ. हिराबाई गो.गायकवाड उच्च माध्यमिक विद्यालय कासारी (90), आर.एम. धारीवाल विद्यानिकेतन ज्यु.कॉलेज कोंढापुरी (89.36), कै.आर.जी.पलांडे आश्रमशाळा मुखई (96.51), माध्यमिक व उच्च माध्य.विद्यालय सणसवाडी (97.61), समाजभुषण संभाजीराव भुजबळ उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव ढमढेरे (87.59), विद्या विकास मंदिर करंदी (79.59),  एस.पलांडे ज्यु.कॉलेज शिरूर (98.30), विजयामाला ज्यु.कॉलेज ऑफ सायन्स शिरूर (99.06), श्री महागणपती ज्यु.कॉलेज रांजणगाव गणपती (97.05), ग्लोरी ज्यु.कॉलेज ऑफ सायन्स कोरेगाव भीमा (99), स्वा. सै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय पिंपळे हिवरे (92.85),   कालिकामाता माध्य.व उच्च माध्य.विद्यालय वाघाळे (92.30), श्री भैरवनाथ विद्यालय आलेगाव पागा (95.52), आदर्श माध्य. व उच्च माध्य.विद्यालय (96.96), श्री गुरूदेवदत्त विद्यालय सविंदणे (87.71), आर.एम.धारीवाल इंग्लिश मेडियम ज्यु.कॉलेज ऑफ कॉमर्स शिरूर (100), न्यू इंग्लिश स्कूल शिरूर (100),

सणसवाडी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा बारावीचा निकाल ९७.६१ टक्के  लागला असून विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असल्याची माहिती प्राचार्य बी.डी.गोरे यांनी दिली. विद्यालयातील प्रथम तीन गुणवत्ताधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे : वाणिज्य शाखा :- प्रथम -  सुप्रिया रामचंद्र कामठे(८५.५३ टक्के), द्वितीय -  संध्या शिवाजी दरेकर(८०.३० टक्के), तृतीय -  शुभांगी गंगाधर जगताप(७९.२३ टक्के). सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ हरगुडे, सचिव  निवृत्ती दरेकर, शिरूर पंचायतसमितीच्या माजी उपसभापती मोनिका हरगुडे, सरपंच रमेश सातपुते यांनी अभिनंदन केले.

विद्या विकास मंदिरचा निकाल ८१.८१ टक्के

निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदिरचा निकाल ८१.८१ टक्के लागला. प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे : कला शाखा : प्रथम - पुजा दत्तात्रय तावरे(७९.६९ टक्के), द्वितीय - राणी पठाण चव्हाण(७८.३० टक्के), तृतीय - सायली भाऊसाहेब घोलप(६५.५३ टक्के).व्यावसायिक अभ्यासक्रम शाखा : प्रथम - प्रियंका सतिष जायकर(७७.८४ टक्के), द्वितीय -  शीतल शंकर साळुंके(७६.६१ टक्के), तृतीय - गौरी मनोहर पिंपळे(७६.४६ टक्के).सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी अभिनंदन केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या