ICC World Cup 2019 : आजपासून रनसंग्राम

Image may contain: 11 people, people smiling, people standing and suitलंडन, ता. 30 मे 2019 : दर चार वर्षांनी येणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभमेळ्याला आजपासून (गुरुवार) लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरुवात होणार आहे. ‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या या १२व्या पर्वात जगातील अव्वल १० देश जगज्जेतेपदावर आपली नाममुद्रा कोरण्यासाठी एकमेकांशी निकराने झुंजतील.

तब्बल ४६ दिवस रंगणाऱ्या या महासंग्रामात राऊंड रॉबिन पद्धतीनुसार एकूण ४८ एकदिवसीय सामने होणार आहेत. साखळीत प्रत्येक संघ एकमेकांशी भिडणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विजय मिळवून बाद फेरी गाठताना सर्व संघांची कसोटी लागणार आहे.

क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडमध्ये १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९नंतर पाचव्यांदा विश्वचषकाचे आयोजन होत असले तरी यजमानांना गेल्या ४४ वर्षांपासूनचा विश्वचषक विजयाचा दुष्काळ संपवता आलेला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार समजला जात आहे. १९८३ आणि २०११च्या विश्वविजेतेपदाची पुनरावृत्ती करण्यासाठी विराटसेनाही सज्ज झाली आहे. चेंडूतील फेरफार प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियाची प्रतिमा मलिन झाली असली तरी या प्रकरणाचे सूत्रधार डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या पुनरागमनानंतर आता कांगारूंचा संघ सहाव्यांदा विश्वचषक पटकाविण्यासाठी उत्सुक आहे.

9 जून : भारत वि. ऑस्ट्रेलिया
13 जून : भारत वि. न्यूझीलंड
16 जून : भारत वि. पाकिस्तान
22 जून : भारत वि. अफगाणिस्तान
27 जून : भारत वि. वेस्ट इंडिज
30 जून : भारत वि. इंग्लंड
2 जुलै : भारत वि. बांगलादेश
7 जुलै : भारत वि. श्रीलंका

भारताविरुद्ध पाकिस्तान रचणार इतिहास, मोडणार का आतापर्यंतचा रेकॉर्ड...
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर साऱ्या क्रिकेट जगताचे लक्ष असते. पण आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये झालेल्या एकाही सामन्यात पाकिस्तानला भारतावर मात करता आलेली नाही. पण यावेळी मात्र इतिहास बदलणार असल्याचे संकेत पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने दिले आहेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान भारताला पराभूत करेल, अशी आशा इंझमामने व्यक्त केली आहे.

वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत सहा सामने खेळवले गेले आहेत. पण या सहा पैकी एकाही सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागलेला नाही. त्यामुळे आतापर्यंतचा वर्ल्डकप रेकॉर्ड भारताला कायम ठेवता येतो का, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या