कारेगाव ला 'फुड एक्सप्रेस फॅफे'चे उद्घाटन

Image may contain: 10 people, people smiling, people standingकारेगाव,ता.४ जुन २०१९(प्रतिनीधी) : ग्रामीण भागातील तरुणाने व्यावसायाची कोणतीही पार्श्वभुमी नसताना उद्योग व्यवसायात घेतलेली गरुडझेप ही वाखाणण्याजोगी असुन तरुणांनी व्यावसायाकडे वळावे असे प्रतिपादन शिरुर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी केले.

कारेगाव(ता.शिरुर) येथे उद्योजक विजेंद्र गद्रे यांच्या फुड एक्सप्रेस कॅफे या नवीन व्यावसायाचे उद्घाटन माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना ते म्हणाले कि, सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाने व्यावसायात उतरताना गुणवत्तेला प्राधान्य देणे गरजेचे असुन गद्रे यांनी हॉटेल व्यवसायत अल्पावधीत घेतलेली गरुडझेपही कौतुकास्पद असल्याचे पवार यांनी गौरवोद्गार काढले.

यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे,जि.प.माजी अध्यक्ष प्रदिप कंद,राष्ट्रवादीचे प्रदेशउपाध्यक्ष मंगलदास बांदल,बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे आदींची यावेळी भाषणे झाली.या कार्यक्रमाला शिरुरचे सी.ए.आदेश गुंदेचा,उद्योजक संकेत कर्नावट,बाजारसमितीचे संचालक बंडु जाधव, सचिव अनिल ढोकले,घोडगंगेचे माजी संचालक नरेंद्र माने,सरपंच एम.एस.कदम,सतीश चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजेंद्र गद्रे यांनी केले तर अमोल पवार यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या