तळेगाव ढमढेरे येथे सामूहिक वाढदिवस सोहळा साजरा

Image may contain: 8 people, people standing
तळेगाव ढमढेरे, ता. 4 जून 2019: येथे सामूहिक वाढदिवस सोहळा येथील सावता महाराज मंदिरात भैरवनाथ उत्सव मंडळ, सावता माळी भजनी मंडळ, किसनभाऊ भुजबळ युवा मंच व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक वाढदिवस सोहळा या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पूर्वी मुलांना शाळेत प्रवेश घेताना बऱ्याच पालकांना जन्मतारीख माहीत नसायची त्यामुळे गुरुजी अंदाजे १ जून ही जन्मतारीख टाकून पाच वर्षे पूर्ण झाल्याचे दाखवून प्रवेश देत होते. त्यामुळे बहुतांश लोकांचा वाढदिवस हा शाळेतील जन्म तारखेनुसार १ जून आहे. सामुदायिकरीत्या अशा सुमारे २० जणांचा सामुदायिक वाढदिवस सोहळा साजरा करण्यात आला.

या समारंभात कैलास नरके, बाळासाहेब घुले, रत्नाकर शिंत्रे,नागनाथ बोराडे, पोपट भुजबळ, लक्ष्मण शिंदे, सोमनाथ कुदळे, चंद्रकांत भुजबळ, हनुमंत भुजबळ, संस्कार नरके, मीनाक्षी ढमढेरे, पोलीस पाटील पांडुरंग नरके, सुरेश भुजबळ, निरंजन गायकवाड, अनिल भुजबळ, शिवाजी भुजबळ आदींचे  वाढदिवस साजरे करण्यात आले.यावेळी शिरूर  बाजार समितीचे माजी सभापती अरविंददादा ढमढेरे, संचालक संभाजी ढमढेरे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्रीकांत ढमढेरे, पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सुरेखा भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य महेश भुजबळ, शिरूर तालुका संजय गांधी निराधार योजनेचे  अध्यक्ष संदीप ढमढेरे, अँड.सुहास ढमढेरे, हनुमंत लांडे, माऊली भुजबळ, शिवाजी भुजबळ, किरण होले आदी मान्यवर उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्रित येऊन समाजहिताची कामे करणे गरजेचे असल्याचे यावेळी बोलताना सेवानिवृत्त तलाठी कैलास नरके यांनी सांगितले.

सामूहिक वाढदिवसाचे औचित्य साधुन या जन्मोत्सवाचे असंख्य लाभार्थि आसलेल्या समस्त मान्यवर महोदयांना हेच अभिष्टचिंतन की, प्रत्येकाने आज आपल्या ह्या महत्वपूर्ण जन्मदिनी गुरुजनांचा आदर राखण्यासाठी एक तरी रोप लावून, झाडाचे सरक्षण करावे. झाडाच्या कुंपणावर नांव व दिनांक जरुर टाकून त्याचे संवर्धन करावे.
- श्रीकांत ढमढेरे, सेवानिवृत विस्तार अधिकारी, जि. प. पुणे

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या