शिल्पा गायकवाड खेळात शेर तर अभ्यासात सव्वाशेर...

Image may contain: 1 person, smiling, closeupशिरूर, ता. 5 जून 2019 (प्रा. संदीप घावटे) : विद्याधाम प्रशाला शिरूर येथे विज्ञान शाखेत शिकत असणाऱ्या शिल्पा अरूण गायकवाड या विद्यार्थीनीने आपण खेळात शेर तर अभ्यासात सव्वाशेर असल्याचे दाखवुन दिले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील असणारी शिल्पा हिने बारावीमध्ये विज्ञान शाखेत ८९.३८ टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक मिळवला. अभ्यासाबरोबरच खेळाचे मैदान गाजवत असताना तीने आतापर्यंत सहा राज्य स्पर्धामध्ये तिहेरी उडी क्रीडा प्रकारात सहभाग घेतला आहे. नाशिक, नागपूर, कराड, औरंगाबाद, सांगली, येथील मैदाने तिने गाजवली. औरंगाबाद येथील राज्य स्पर्धेत कांस्य पदक पटकावले होते. यावर्षी पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावून कराड (सातारा) येथील शालेय राज्यस्तर स्पर्धेत ती सहभागी झाली होती.

अभ्यासाबरोबरच खेळासाठी वेळ देताना दररोज क्रीडा शिक्षक संदीप घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तास सराव करायची. शिवाय, घरकाम, शेतीकामातही आईवडीलांना मदत करत होती.  इतर वेळी ती मन लावून अभ्यास करत असे. अभ्यासासाठी मैदानाकडे पाठ फिरवणारे अनेक विद्यार्थी आहेत पण शिल्पाने मात्र अभ्यास आणि खेळ, स्पर्धा याच गणित योग्य पद्धतीने जुळवले. इयत्ता दहावीला तीने शंभर टक्के गुण प्राप्त केले होते. बारावीला ८९.३८ टक्के गुण प्राप्त केले तर
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यात तीने ९८.३१ टक्के गुण प्राप्त केले आहेत.

शिल्पाच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुकुमार बोरा, शाळा समिती अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बाफना, सचिव तु. म. परदेशी, प्राचार्य धनाजी खरमाटे, नुतन प्राचार्य अनिल तांबोळी यांनी विशेष कौतुक केले.

www.shirurtaluka.com सोबत बोलताना शिल्पा म्हणाली, 'अभ्यास आणि खेळ यांची मी योग्य सांगड घालू शकले. मला दोन्ही क्षेत्र आवडीची आहेत. त्यामुळे प्रामाणिक प्रयत्नामुळे दोन्ही ठिकाणी यश संपादन करू शकले. भविष्यात प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा असून, तयारी सुरू केली आहे.'

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या