शिरुर तालुक्यात टॅंकरची मागणी वाढली

Image may contain: 1 person, smiling, standing and outdoorशिरुर,ता.७ जुन २०१९(प्रतिनीधी) : जुन महिना सुरु होउन ही शिरुर तालुक्यात दुष्काळाची दाहकता तीव्र जाणवत असुन शिरुर तालुक्यातील गावांना नागरिकांच्या मागणीनुसार ४२ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती शिरुरचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदिप जठार यांनी दिली.तर छारा छावण्यांनी ४३५२ जनावरांचा सांभाळ केला जात आहे.

शिरुर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासुन दुष्काळी भागात मागणीनुसार प्रशासनाकडुन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.जुन महिना सुरु होउनही अद्याप पाण्याची मागणी तीव्र असुन तालुक्यातील मिडगुलवाडी येथे १ टॅंकर ३ खेपा,केंदुर-६ टॅंकरद्वारे १८ खेपा, पाबळ-८ टॅंकर २२ खेपा,कान्हुरमेसाई-३ टॅंकर ८ खेपा,खैरेनगर-१ टॅंकर ३ खेपा,धामारी-२ टॅंकर ८ खेपा,खैरेवाडी-१ टॅंकर ३ खेपा,हिवरे-१ टॅंकर ४ खेपा,सोनेसांगवी- १ टॅंकर,मलठण-१ टॅंकर ३ खेपा,कोंढापुरी-१ टॅंकर ४ खेपा,तळेगाव ढमढेरे-१ टॅंकर २ खेपा,शिरसगाव काटा-२ टॅंकर ६ खेपा,इनामगाव-३ टॅंकर ९ खेपा,न्हावरे-३ टॅंकर ९ खेपा,आंबळे-१ टॅंकर ३ खेपा,बाभुळसर बुद्रुक-१ टॅंकर ३ खेपा,चिंचोली-१ टॅंकर,मांडवगण फराटा- २ टॅंकर ६ खेपा,रावडेवाडी-१ टॅंकर २ खेपा,निमोणे-२ टॅंकर ५ खेपा या गावांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.

यासंदर्भात जठार यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि,शिरुर पंचायत समितीकडुन दुष्काळाच्या प्रारंभी १०० पाण्यांच्या टाक्यांचे वाटप केले असुन भविष्यात तालुक्याला पाणीटंचाईला सामोरे जावु लागु नये म्हणुन तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये गाळमुक्ती तसेच विविध जलयुक्त शिवार मोहिमेची कामे मोठ्या प्रमाणावर केली आहेत.त्याचा परिणाम आगामी काळात दिसुन येइल.दुष्काळाच्या झळा माणसांबरोबरच या जनावरांनाही बसत असुन तालुक्यातील जनावरांसाठी केंदुर,कान्हुरमेसाई,पाबळ,न्हावरे,टाकळी हाजी,निमगाव दुडे येथे चारा छावणी सुरु करण्यात आली असुन केंदुर येथील छावणीत ८५३ जनावरे,कान्हुरमेसाई येथे ७७५,पाबळ येथे ३९१,न्हावरे येथे ६३७,टाकळी हाजी येथे ८९३,निमगाव दुडे येथे ८०३ अशा मिळुन तालुकयातील सर्व छावणीतील मिळुन ४३५२ जनावरांचा सांभाळ केला जात आहे.शिरुर तालुक्यात सर्वाधिक दुध उत्पादक असणा-या गावांमध्ये दुध उत्पादन कमालीचे घटले असुन त्याची झळ पशुपालकांबरोबरच डेअरीचालकांनाही बसली आहे.

शिरुर तालुक्यातील घोड धरणाखालील लाभ क्षेञात असणारे बंधारे पुर्णपणे कोरडे असुन भिमानदीकाठीही असणा-या गावांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असुन उन्हाळी पिके पाण्याअभावी जळाली असुन निंबु,डाळिंब,आंबा आदी फळबागांना अत्यल्प पाण्याचा फटका बसला असुन फळबागा  नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या