SSC Result : दहावीचा आज निकाल; असा पाहा...

Image may contain: one or more people, people sitting, table and indoorमुंबई, ता. 8 जून 2019 : इयत्ता दहावीचा निकाल शनिवारी (ता. 8) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात एसएससी बोर्डाने दिली. गेल्यावर्षाही दहावीचा निकाल 8 जून रोजी लागला होता. 

'दहावीचा निकाल आज जाहीर होणार' असा मेसेज दररोज सोशल मीडियावर वाचायला मिळत असल्यामुळे दहावीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आणि पालक हैराण झाले होते. आधीच गॅसवर असलेले विद्यार्थी दररोज उठणाऱ्या अफवांमुळे बुचकळ्यात पडले होते.

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांनाही आपल्या निकालाचे वेध लागले होते. दहावी एसएससी बोर्डाचा निकाल सात जूनला जाहीर होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वायरल झाल्या होत्या. शिवाय, सोशल मीडियावर जुन्या लिंक पाठवून अफवा पसरवल्या जात आहेत.

मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे दहावी परीक्षा घेण्यात आली. गेल्यावर्षाही दहावीचा निकाल 8 जून रोजी लागला होता.

याठिकाणी पाहता येणार निकाल
कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव अश्विनी आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये ASH असं लिहावं लागेल. दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. त्यानंतर काही दिवसांनी आपापल्या शाळेतून विद्यार्थी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र घेऊ शकतात.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या