निमोणेत झालेल्या विचिञ अपघातात दोघांचा मृत्यु

Image may contain: 1 person, close-up and textनिमोणे,ता.९ जुन २०१९(प्रतिनीधी) : निमोणे-इनामगाव रस्त्यावर ट्रॅव्हलर बस,स्प्लेंडर,स्कुटी या वाहनांच्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यु झाला तर दोघे गंभीर जखमी झाले असल्याची घटना घडली.

या अपघातात आकाश बंडु मोहिते(वय.२६,रा.इनामगाव) व अशोक मातकर(संपुर्ण माहिती कळु शकली नाही) यांचा मृत्यु झाला आहे.तर शंकर उदमले(वय.२८,रा.मांडवगण फराटा) व आणखी एक(नाव कळु शकले नाही) हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,आकाश हा(दि.८) रोजी राञी स्प्लेंडर गाडीवरुन शंकर उदमले यास मागे बसवुन इनामगाव ते निमोणे असा जात असताना समोरुन येणा-या टेंपो ट्रॅव्हलर बस (एम.एच.१२.के.क्यु ६०९९) हिने समोरुन ठोस मारली.यानंतर जाणा-या स्कुटी मोटारसायकललाही ठोस दिली.या अपघातात स्प्लेंडर गाडीवरील आकाश यास तसेच स्कुटी गाडीवरील अशोक मातकर यास गंभीर मार लागुन त्यांचा मृत्यु झाला.तर स्प्लेंडर गाडीवर मागे बसलेले शंकर उदमले व स्कुटी गाडीवरील आणखी एक यांना गंभीर दुखापत झाली.सदर जखमींना पुढील उपचारकामी पुण्यातील ससुन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

सदर घटनेची माहिती कळताच शिरुर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेउन पंचनामा केला असुन पुढील तपास सुरु आहे.
 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या