कारेगावमध्ये अवैध दारुविक्री चालू; मुलीला छेडले (Video)

https://scontent.fnag1-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/62392944_2205627379529386_1614129674265296896_n.jpg?_nc_cat=105&_nc_oc=AQnF_US3ZfwuenocvZxgUAMz9priCKEyXCLhYMr5nHXZSMM7zjgr4oc9Sl5zoai-QOCtGpnGEnk6Ca9KAcajPohj&_nc_ht=scontent.fnag1-1.fna&oh=dd8cf6d5e9c6f9aaaf895b2cf90064ff&oe=5D8DACA4कारेगाव, ता. 12 जून 2019 (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे दोन महिन्यांनंतर परत चायनीजच्या नावाखाली अवैध दारुविक्री चालू झाली आहे. हॉटेल मध्ये येणाऱ्या दारूड्यांमुळे महिला, मुली व नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. रविवारी आठवडे बाजारात एका अल्पवयीन मुलीला छेडण्याचा प्रकार झाल्याने मंगळवारी (ता. ११) गावातील संतप्त महिलांनी दारुचे हॉटेल बंद पाडले.

८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गावातील अनेक महिलांनी एकत्र येऊन कारेगाव येथे अवैधरीत्या चालू असलेली बिंगो व दारूची दुकाने मोठया प्रमाणात तोडफोड करत बंद पाडली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुक असल्याने आचारसंहिता लागू झाली होती. परंतु, आचारसंहिता संपल्यावर काही व्यवसायिकांनी चायनीजच्या नावाखाली स्वतःच्या हॉटेलमध्ये दारु विक्रीला ठेवली. ज्या ठिकाणी हे हॉटेल आहे, त्या ठिकाणाहून कायम महिला, शाळेतील मुल-मुली, कामगारांचे येणं-जाणं चालू असते. हे हॉटेल रस्त्यावरच असल्याने महिला व मुलींना या दारूड्यांचा त्रास होतो. शाळेतील मुली, कॉलेजला जाणाऱ्या मुली यांच्याकडे बघून अश्लील हावभाव करणे, अश्लील कॉमेंटस करण असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. दारूड्यांच्या कोण नादी लागणार, अस म्हणून सगळेच गप्प बसत आहेत. परंतु, याचाच फायदा घेत रविवारी (ता. 9) रोजी आठवडे बाजाराच्या दिवशी एका दारूड्याने एका अल्पवयीन मुलीचे पाठीमागून केस ओढले तसेच तिचा हात धरला. परंतु, हे सगळं चालू असताना आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी मात्र फक्त बघ्याची भूमिका घेतली. सोमवारी एक कामगार कामाला जात असताना दोन दारुड्यांची आपआपसात भांडण होते. एका दारुड्याने फेकलेली बाटली त्याच्या हाताला लागली. त्या गोष्टीचा जाब विचारला असता दारुड्यांनी उलट त्या कामगारालाच मारहाण केली. त्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्त्या राखी नवले यांनी दारुविक्री करणाऱ्या हॉटेल वर जाऊन दारुविक्री बंद केली.

कारेगाव येथे हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असताना ही राजरोसपणे बेकायदा दारुविक्री चालूच असल्याने पोलिस काय करतात? असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडला आहे. कारेगाव मध्ये सर्वपक्षीय राजकीय नेते असूनही अवैध दारुविक्री होते. परंतु, राजकीय नेते फक्त मतापुरतच राजकारण करतात का? असा प्रश्न पडतो. कारेगाव येथे जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे सभापती विश्वासआबा कोहकडे, भाजपचे समर्थक गावचे सरपंच अनिल नवले अशी सर्वपक्षीय मंडळी असताना गावात अवैध व्यवसाय सुरु आहेत, हि मोठी शोकांतिका आहे.


Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या