शिरुर पोलीसांकडुन १ कोटी २६ हजारांच्या जुन्या नोटा जप्त

Image may contain: 7 people, people smilingशिरुर,ता.१२ जुन २०१९(प्रतिनीधी) : शिरुर पोलीसांनी गस्त घालत असताना एक कोटी २६ हजार रुपयांच्या जुन्या चलनी नोटा जप्त केल्या आहेत.तर या प्रकरणी तिघांना अटक  करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिली.या घटनेने शिरुर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी १) गणेश शिवाजी कोळेकर(वय.२५,रा.संविदणे),२)समाधान बाळु न-हे(वय.२१,रा.आमदाबाद),३) अमोल देवराम दसगुडे (वय.२५,रा.कर्डेलवाडी) यांना अटक केली. या प्रकरणी तीन जणांवर (द स्पेसिफाईड बँक नोट्स कायदा  २०१७ चे कलम  ५ व ७) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबतची माहिती आयकर विभागाला कळविण्यात आली असून पुण्यातील एक बांधकाम व्यसायिक या प्रकरणी फरारी आहे.

या विषयी पञकार परिषदेत माहिती देताना पोलीस निरीक्षक सारंगकर यांनी सांगितले कि,८ जून २०१९ रोजी राञी कवठे येमाई येथे राञी एक ते  दिडच्या सुमारास पोलीस निरीक्षक सारंगकर हे कर्मचा-यांसह गस्त घालत असताना त्यांना हुंदाई कंपनीची ई वान कार (एम एच १४ ई .यु.११९४) ही संशयास्पद कार आढळली. पोलीसांना या संशयास्पद रित्या जाणा-या कारचा संशय आल्याने  गाडी थांबवुन झडती घेण्यात आली.यावेळी सदर कारमध्ये तीन जण होते व गाडीतील ड्रायव्हर सीटमागे एक बॅग पोलीसांना निदर्शनास आली.सदर बॅगची तपासणी केली असता, यात पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या चलनातल्या सर्व मिळुन एक कोटी २६ हजार रुपयेचा नोटा सापडल्या.यायाबाबत पोलीसांनी तिघांकडे अधिक चौकशी केली असता,यातील आरोपी समाधान न-हे यांना पुण्यातील एका बांधकाम व्यवसायिकाने एक हजार व पाचशे रुपयांच्या त्यांच्या कडील एक कोटी २६ हजार रुपयेच्या जुन्या चलनातील नोटा बदलण्यासाठी कमिशन बेसवर न-हे याला दिल्या होत्या. न-हे हा पुण्यातील एका महाविद्यालयातील विद्यार्थी आहे.न-हे याचा कोळेकर हा मित्र आहे.गेल्या काही दिवसांपासून या जुन्या नोटा बदलण्याच्या प्रयत्नात ते होते असे सारंगकर यावेळी म्हणाले. दरम्यान एक कोटी व ६ हजार रुपयेची रक्कम सापडल्याचे वृत्त कळताच शिरुर तालुक्यात मोठी खळबळ माजली असुन अनेकांचे धाबे दणाणले आहेत.हि कारवाई पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यासह पोलीस हवालदार सुरेश चौधरी, पोलीस कॉंस्टेबल बाळासाहेब हराळ यांनी केली असुन पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या