शिरुर-चौफुला मार्गावरील महाकाय वृक्षांची कत्तल? (Video)

Image may contain: one or more people, outdoor and natureकरडे,ता.१३ जुन २०१९(तेजस फडके) :  शिरूर- न्हावरा रोडवर रस्ता रुंदीकरणासाठी अनेक मोठ्या झाडांची कत्तल सुरु असुन अष्टविनायक महामार्गासाठी करडे ते न्हावरा रस्त्यावर रुंदीकरणाचे काम चालू आहे या रस्त्याचे वैभव असलेली असंख्य जुनी आणि मोठी कडूलिंब,वड, पिंपळ अशी अनेक  झाडे कापली जात आहेत.६ जुन रोजी सगळीकडे पर्यावरण दिन जोरात साजरा केला गेला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी या झाडांवर करवत चालवली गेली असल्याने स्थानिक नागरीक संतप्त झाले आहेत.

सध्या संपुर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असुन त्याच मुख्य कारण म्हणजे पर्यावरनाचा होत चाललेला ऱ्हास,शेकडो झाडांची कत्तल झाल्याने पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झाले असुन त्याचाच परीणाम म्हणुन दर दोन ते तीन वर्षांनी राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे.त्यामुळे शासन वेगवेगळ्या माध्यमातून झाड लावण्यासाठी प्रयत्न करत आहे.परंतु एकीकडे शासन झाड लावा झाड जगवा अस म्हणत परंतु दुसरीकडे रस्ता रुंदीकरण करण्यासाठी अनेक वर्षे जुनी झाडांची कत्तल केली जाते हा मोठा विरोधाभास आहे.मोठ्या वडाच्या झाडांना काढून दुसरीकडे पुन:रोपन करणे शक्य असताना सार्वजनिक बांधकाम खाते मात्र तस करताना दिसत नाही.

शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात इंधन म्हणून लाकूड वापरले जाते आणि यासाठी तालुक्यात अनेक ठिकाणच्या शेकडो झाडांची बेकायदेशीरपणे कत्तल होत असताना वनखात्याचे अधिकारी मात्र बघ्याची भुमिका घेत आहे.त्यामुळे तालुक्यातील लाकडाच्या वखारीमध्ये झाडांची कत्तल केलेली झाड कुठुन येतात याची चौकशी झाली पाहिजे.
वृक्षतोडी बाबत संबंधित कॉन्ट्रॅक्टर संदिप पाटील यांच्याशी संपर्क साधला असता.त्यांनी www.shirurtaluka.com शी बोलताना सांगितले की कापलेल्या झाडांच्या दीड पट झाडे लावायचे कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद आहे.तसेच वनविभागाकडे याबाबतीतली सर्व कागदपत्रे दिलेली आहेत.

याबाबत करडे येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल घायतडक यांनी सांगितले की अनेक वर्षे उभी असलेल्या ह्या झाडांचं पुन्हा दुसरीकडे रोपण करण गरजेचं आहे.एवढी मोठी झाडे होण्यास कित्येक वर्षांचा कालावधी लागतो.पण आज रोड रुंदीकरण करताना त्या झाडांची कत्तल होणं दुर्दैवी आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या