कधीच कोरडी न पडणारी नदी झाली 'डेड रिव्हर'

Image may contain: one or more people, people standing, people walking, outdoor and nature
सादलगाव, ता. 15 ऑगस्ट 2019 (संपत कारकूड): 'कधीच कोरडी न पडणारी नदी' व 'बारामाही वाहणारे पाणी' असे बिरुदवली मिरवून नावलौकीक पावलेली भीमा नदी सध्या 'डेड रिव्हर' झाली आहे.

पुर्वपार बारामाही पाणी पुरविणारी भरोषाच्या भीमा नदी पात्रातील पाणीसाठा शुन्य झाला असल्यामुळे नदीचे पात्र भकास झाले आहे. सार्वजनिक पाटबंधारे विभागाकडून दरवर्षी या नदीवर बांधलेल्या बंधाऱयात पाणी आडवून पाण्याच्या नियोजन केले जाते. परंतु, हे नियोजन पुर्णपणे कोलमडले आहे. शिरुर पुर्व भागातील भीमानदीकाठवर दुतर्फी परिसरातील असंख्य शेतकरी शेतीसाठी साठविलेल्या पाण्यामुळे आपली शेती पिकवित होते. परंतु, यावर्षी पाण्याने लवकरच दगा दिल्यामुळे उभी पिके शेवटची घटका मोजित आहेत. यामध्ये ऊस या पिकास मोठा फटका बसला असून कधी नव्हे अशी पाण्याची आणीबाणी आली आहे.

शेतकरी आपल्या शेतामध्ये बोअरवेल खोदून शेतात उभ्या पिकाची तहान भागवित आहे. 1972 च्या दुष्काळानंतर प्रथमच पाण्याबाबत मोठया दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ सध्या सर्वच शेतकऱयांवर आली आहे. नदीपात्रातील कधीच तळ न गाठणारे पाण्याचे ढोह उजाड पडले असून, नदीमध्ये फक्त दगडधोंडे आणि चाळलेल्या वाळूंचे ढिग दिसत आहेत. पाण्याचे खरे महत्व आता शेतकऱयांना पटलेले असून, प्रत्येक नागरिकांना पाणी साक्षर होण्याची वेळ आली आहे. पाणी का कमी झाले? याचे एक कारण नाही. असंख्य कारणे आहेत. परंतु पाणी हे जिवन आहे आणि ते टिकविले पाहिजे आणि वाढविलेही पाहिजे याची जाणीव मात्र या दुष्काळाने करुन सर्वांना करुन दिली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या