कारेगावमध्ये अवैध धंदे करणार नसल्याची लेखी हमी

https://scontent.fnag1-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/62392944_2205627379529386_1614129674265296896_n.jpg?_nc_cat=105&_nc_oc=AQnF_US3ZfwuenocvZxgUAMz9priCKEyXCLhYMr5nHXZSMM7zjgr4oc9Sl5zoai-QOCtGpnGEnk6Ca9KAcajPohj&_nc_ht=scontent.fnag1-1.fna&oh=dd8cf6d5e9c6f9aaaf895b2cf90064ff&oe=5D8DACA4
कारेगाव, ता. 15 जून 2019 (तेजस फडके): कारेगावमध्ये यापुढे अवैध धंदे करणार नाही, अशी लेखी हमीच या धंदेवाल्यांनी दिली. त्यामुळे महिलांच्या लढ्याला यश आले आहे. www.shirurtaluka.com ने याबाबतचे वृत्त व्हिडिओसह प्रसिद्ध करत पाठपुरावा केला होता.

कारेगाव येथील वाढलेले अवैध धंदे व त्यामुळे व्यसनाच्या आहारी गेलेली तरुण पिढी, मटका, जुगार खेळण्याकडे तरुणांचा वाढलेला कल, व्यसनामुळे उद्‌ध्वस्त होणारी कुटुंबे, महिलांसाठी निर्माण झालेले असुरक्षित वातावरण यामुळे येथील महिलांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यास पोलिस प्रशासनानेही वेळोवेळी पाठिंबा देत सहकार्याची भूमिका दाखवली होती. त्यामुळे मागील काही काळात या धंद्यांना दणका बसला होता. मात्र, तरीही काही व्यावसायिक दारूची चोरून विक्री करत होते. त्यातूनच एका दारुड्याकडून एका अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडला. त्यामुळे दारू व्यावसायिकांचे अड्डेच उद्‌ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला होता.

शुक्रवारी (ता. 14) गावातील अवैध दारू धंद्याच्या ठिकाणी महिलांनी आपला ठिय्या मांडला. जोपर्यंत प्रशासन हे दारूधंदे कायमस्वरूपी बंद करत नाहीत; तोपर्यंत येथून उठणार नसल्याचे सांगत आक्रमक पवित्रा घेतला. या वेळी रांजणगाव औद्योगिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मनोज यादव यांनी पुढाकार घेऊन हे दारूधंदे कायमस्वरूपी बंद करण्याची ग्वाही दिली. दरम्यान, संतप्त झालेल्या महिलांचा रुद्रावतार पाहून अवैध दारू धंदे करणाऱ्यांनीही, आम्ही या पुढील काळात दारूधंदे करणार नसल्याची लेखी हमी दिली. त्यानंतर महिलांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या