शिरुर तालुका भीषण दुष्काळाच्या छायेखाली...

Image may contain: sky, ocean, outdoor, nature and waterशिरुर,ता.१६ जुन २०१९(अभिजित आंबेकर) : चालू वर्षी मान्सुन पुर्व व मान्सुन पाउस जर लांबला तर शिरुर तालुक्यात सर्वात मोठी दुष्काळाची परिस्थिती गंभीर होणार असुन शेतीच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबर चारा,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे.

Image may contain: 8 people, people smiling, people standing and outdoorमागिल वर्षी मान्सुनचा पाउस तालुक्यात न झाल्याने खरिपाची पिके पुर्णपणे शेतक-यांच्या हातातुन गेली होती.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता.त्यामुळे चालुवर्षी मान्सुन पुर्व व मान्सुन पाउस पडणे अत्यंत गरजेचे आहे.गतवर्षी कमी पडलेल्या पावसामुळे शिरुर शहराला फेब्रुवारीपासुनच पाणीटंचाइला तोंड द्यावे लागत असुन शिरुर शहरातील शहराला पाणीपुरवठा करणारा कोल्हापुर पद्धतीच्या बंधा-यात डिंभा व कुकडी प्रकल्पाच्या कालव्यातुन व नदीद्वारे पाणी सोडण्यात आले.त्यामुळे काहि काळ शहराचा पाणीप्रश्न सुटला.माञ ५० हजारांवर लोकसंख्या असलेल्या शिरुर शहराला दहा दिवस पुरेल एवढेच पाणीसाठा सध्या कोल्हापुर पद्धतीच्या बंधा-यात शिल्लक असुन जर मान्सुन लांबल्यास शिरुर शहराला अनेक वर्षानंतर भिषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असुन शहरातील नागरिकांना टॅंकर शिवाय पर्याय उरणार नाही.

शिरुर तालुक्यातील भिमानदीकाठावरील असणा-या मांडवगण फराटा,वडगाव रासाई,गणेगाव दुमाला,नागरगाव,बाभुळसर बुद्रुक आदी  गावांमध्ये उसाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते.भिमानदीच्या पाण्यावर अवलंबुन अनेक पिके या भागात घेतली जातात.माञ मागिल वर्षी पडलेल्या कमी पावसामुळे भिमानदीचे पाञ अनेक दिवसांपासुन कोरडे पडले आहे.मांडवगण फराटा या गावाला प्रथमच टॅंकर सुरु करावा लागला आहे.जर चालु वर्षी मान्सुन उशिरा सुरु झाला तर भिषण पाणीटंचाईबरोबरच उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.मान्सुन पडल्यानंतर उसाचे सर्वाधिक लागवड केली जाते माञ पाउस उशिरा पडल्यास या लागणीही उशिरा सुरु होणार आहेत.तर त्याची सर्वाधिक झळ श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना,घोडगंगा सहकारी साखर कारखाना,श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना तसेच या तालुक्यावर अवलंबुन असणा-या कारखान्यांच्या गळित हंगामावर उस उत्पादन घटल्याने होउ शकतो.

शिरुर-श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या घोडनदीवर बांधण्यात आलेल्या चिंचणी येथील घोड धरणात मृतपाणीसाठाही घटत चालला असुन या धरणातुन शिरुर व पुणे जिल्हयातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहतीला होणारा पाणीपुरवठा या धरणातुन केला जातो माञ आताच मृतसाठा कमी होत चालल्याने औद्योगिक वसाहतीला होणारा पाणीपुरवठाही निम्म्याने कमी करण्यात आली असल्याची घोषणा जिल्हाधिका-यांनी केली आहे.जर मान्सुन लांबला तर याचा थेट परिणाम औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांवर होणार असुन अजुन यापेक्षा जास्त पाणीकपात केल्यास कंपन्यांनाही त्यांचे उत्पादन थांबवावे लागणार असुन त्याचा फटका कामगार वर्गाबरोबरच औद्योगिककरण व अर्थव्यवस्थेवर होउ शकतो.त्यामुळे सर्वात मोठा फटका हा औद्योगिकरणाला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिरुर तालुक्यातील पुर्व भागात कमी पावसाचा फटका नदीकाठच्या गावांना बसला असुन अनेक पिके नष्ट तर झालीच परंतु निमोणे,शिरसगाव काटा,इनामगाव या गावांना पिण्यासाठी टॅंकर ची व्यवस्था करण्यात आली असुन जर पाउस लांबल्यास पाण्याचे या भागात अधिक दुर्भिक्ष जाणवणार आहे.तालुक्यातील केंदुर,पाबळ,मिडगुलवाडी,कान्हुर मेसाई,खैरेनगर,धामारी हिवरे,कोंढापुरी,मलठण,तळेगाव ढमढेरे आदी परिसरात भिषण पाणी टंचाई असुन फेब्रुवारी महिन्यापासुनच या भागाला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु असुन यात वाढ परिसरात सर्वाधिक पाण्याचे टॅंकर सुरु आहेत.

या भागात तालुक्यातील सर्वात जास्त खरिपाचे पिके(मुग,हरभरा,तुर,कडधान्ये,बाजरी आदी) पिके  सर्वात जास्त प्रमाणात घेतली जातात.परंतु मागिल वर्षी कमी पडलेल्या पावसामुळे सर्व खरिपाचे पिके  शेतक-यांच्या हातुन गेली होती.अवघी वीस ते तीस टक्के खरिपातील मुग,बाजरी,आदी धान्य पिके शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या आवारात विक्री साठी आली होती.दरवर्षी शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमितीत पाच ते सात कोटीची उलाढाल होत असते.माञ मागिल वर्षी मान्सुन ने हुलकावणी दिल्याने हे नुकसान शेतक-यांना सोसावे लागले याचा परिणाम शिरुर शहराबरोबरच पारनेर व श्रीगोंदा या तालुक्यांनाही झळ बसली.छोटे व्यापारी,हमाल,मापाडी,टेंपोवाले,सोनेव्यापारी,कापडदुकानदार,किराणा व्यापारी आदींना याचा मोठा फटका बसला.त्यामुळे चालुवर्षी जर मान्सुन लांबला व शेतक-यांची हक्काची कमी वेळेत येणारी पिके  जर गेली तर याचा दिर्घ परिणाम बाजारपेठेवर झाल्याशिवाय राहणार नाही.

जुन महिना सुरु होउनही अद्याप पाण्याची मागणी तीव्र असुन तालुक्यातील मिडगुलवाडी येथे १ टॅंकर ३ खेपा,केंदुर-६ टॅंकरद्वारे १८ खेपा, पाबळ-८ टॅंकर २२ खेपा,कान्हुरमेसाई-३ टॅंकर ८ खेपा,खैरेनगर-१ टॅंकर ३ खेपा,धामारी-२ टॅंकर ८ खेपा,खैरेवाडी-१ टॅंकर ३ खेपा,हिवरे-१ टॅंकर ४ खेपा,सोनेसांगवी- १ टॅंकर,मलठण-१ टॅंकर ३ खेपा,कोंढापुरी-१ टॅंकर ४ खेपा,तळेगाव ढमढेरे-१ टॅंकर २ खेपा,शिरसगाव काटा-२ टॅंकर ६ खेपा,इनामगाव-३ टॅंकर ९ खेपा,न्हावरे-३ टॅंकर ९ खेपा,आंबळे-१ टॅंकर ३ खेपा,बाभुळसर बुद्रुक-१ टॅंकर ३ खेपा,चिंचोली-१ टॅंकर,मांडवगण फराटा- २ टॅंकर ६ खेपा,रावडेवाडी-१ टॅंकर २ खेपा,निमोणे-२ टॅंकर ५ खेपा या गावांनी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे.जर पाउस लांबल्यास अधिकाधिक टॅंकर सुरु करण्याची वेळ प्रशासनावर येणार असुन याचे व्यवस्थापन करायचे कसे असा प्रश्न हि निर्माण होणार आहे.तर दुष्काळाच्या झळा माणसांबरोबरच या जनावरांनाही बसत असुन तालुक्यातील जनावरांसाठी केंदुर,कान्हुरमेसाई,पाबळ,न्हावरे,टाकळी हाजी,निमगाव दुडे येथे चारा छावणी सुरु करण्यात आली असुन केंदुर येथील छावणीत ८५३ जनावरे,कान्हुरमेसाई येथे ७७५,पाबळ येथे ३९१,न्हावरे येथे ६३७,टाकळी हाजी येथे ८९३,निमगाव दुडे येथे ८०३ अशा मिळुन तालुकयातील सर्व छावणीतील मिळुन ४३५२ जनावरांचा सांभाळ केला जात आहे.मान्सुन लांबला तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असुन भविष्यात माणसांना पाणी पुरवायचे किती अन जनावरांना पुरवायचे किती असा प्रश्न प्रशासनापुढे येणार आहे.यामुळे चारा छावणीच्या संख्येत वाढ होउन जनावरे जगविने  हा सर्वात मोठा प्रश्न उभा राहणार आहे.

या पडलेल्या भिषण दुष्काळामुळे तसेच मान्सुन लांबल्याने दुध उत्पादनावर होण्याची दाट शक्यता असुन दुष्काळामुळे दुध उत्पादन घटण्याची शक्यता असुन त्यामुळे काही प्रमाणात भाव वाढीची शक्यता उर्जा उद्योग समुहाचे प्रमुख प्रकाश कुतवळ यांनी दै.पुढारीशी बोलताना व्यक्त केली माञ याचा ग्राहकावर थेट परिणाम होणार नसल्याचे बोलताना सांगितले.तालुक्यातील पश्चिम भागातील चांडोह,काठापुर,टाकळीहाजी,आमदाबाद,कवठे येमाई,पिंपरखेड,संविदने आदी घोडनदीलगत असना-या गावांना दुष्काळाचा फटका बसला असुन जर मान्सुनचा पाउस लांबल्यास या गावांवर सुद्धा पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मान्सुन पुर्व पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात येथील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी पाउस लांबल्याने शेतक-यांच्या चिंतेत भर पडली असुन शिरुर तालुका मोठ्या भिषण दुष्काळाच्या छायेत जाणार असल्याची मते व्यक्त केली जात आहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या