विठ्ठलवाडी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

Image may contain: 11 people, people smiling, people standing and outdoorतळेगाव ढमढेरे,ता.१८ जुन २०१९(आकाश भोरडे) : श्री क्षेत्र विठ्ठलवाडी(ता.शिरूर) येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार बाबूराव पाचर्णे व जिल्हा परिषद सदस्या रेखाताई मंगलदास बांदल यांच्या हस्ते करण्यात आले.

यामध्ये भिमा नदीकाठावरील पेव्हिंग ब्लॉक बसविणे,भोसेवस्ती व भिमा नदीवर नविन घाट बांधणे,भोसेवस्ती अंतर्गत सिंमेट रस्ता तयार करणे,डालभाग वस्ती रस्ता तयार करणे,भोसेवस्ती ते भिल्लवस्ती सिंमेट रस्ता तयार करणे, चर्मकार वस्ती व शिंदेमळा येथे बंदिस्त गटार योजना करणे, शिंदेमळा ते दलित वस्ती सिंमेट रस्ता करणे, संत निळोबा उद्यानाला संरक्षण भिंत तयार करणे, भोसेवस्ती जिल्हा परिषद शाळा इमारत आदी विविध विकासकामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले.

यावेळी संभाजी गवारे,ललिता गाडे,जयेश शिंदे,बाबाजी गवारे,किसन गवारे,दिलीप शेलार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे किसन गवारे यांनी सूत्रसंचालन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या