शाळेच्या पहिल्या दिवशी मिरवणूकीने विद्यार्थ्यांचे स्वागत

विठ्ठलवाडी,ता.१८ जुन २०१९(प्रतिनीधी) : विठ्ठलवाडी येथे नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवानिमित्त आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.                          

विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथील श्री पांडुरंग विद्यामंदिर मध्ये इयत्ता पाचवीच्या नवीन विद्यार्थ्यांचे ढोल ताशा झांजच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. नवीन प्रवेशित या  विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली तर मधुकर लोले व भुमेश गवारे यांच्यावतीने वह्या वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरएसएसचे विभागीय संघचालक संभाजी गवारे होते.

यावेळी सरपंच ललिता गाडे, ग्रामसेवक दादासाहेब नाथ, सोसायटीचे अध्यक्ष काळुराम गवारे, उपाध्यक्ष रायचंद शिंदे, पोलीस पाटील शरद लोखंडे, माजी उपसरपंच बाबाजी गवारे, दिलीप गवारे, मुख्याध्यापक सुरेश थोरात, माजी ग्रामपंचायत सदस्य विश्‍वनाथ गवारे, ज्ञानेश्वर राऊत, किसन गवारे, सचिन शितोळे, दत्तात्रय गवारे, रघुनंदन गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन कला शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीणकुमार जगताप यांनी केले. प्रास्ताविक भाऊसाहेब वाघ यांनी केले. संगीता गवारी यांनी सूत्रसंचालन केले तर  पी.जी.चांदगुडे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या