कोलकाता घटनेच्या निषेधार्थ शिरुरला डॉक्टरांचा बंद

Image may contain: 9 people, people sitting, people standing and indoorशिरुर,ता.१८ जुन २०१९(प्रतिनीधी) : कोलकाता येथील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शिरुर शहरातील सर्व डॉक्टरांनी एकदिवसीय बंद पाळला असुन यात शहरातील तीन संघटनांच्या ८० डॉक्टरांनी सहभाग घेतला.

कोलकाता येथे डॉक्टरांना झालेल्या मारहान प्रकरणाचा निषेध म्हणुन शिरुर शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए),नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन(निमा) तसेच होमिओपॅथिक, या डॉक्टरांच्या तीन संघटनांनी एकदिवसीय संप पुकारला होता.या संपात बाह्यरुग्ण विभाग(ओपीडी),तसेच दैनंदिन सेवा एकदिवसासाठी संपुर्णपणे बंद ठेवण्यात आल्या होता,माञ अतिदक्षता विभाग व इमर्जन्सी सेवा माञ संपात वगळल्या होत्या.इंडियन डेंटल असोशिएशननेही संपात सहभाग नोंदविला.

याविषयी आयएमएचे अध्यक्ष डॉ.संदिप कोकरे यांनी सांगितले कि,डॉक्टरांवर होणारे हल्ले हि चिंतेची बाब असुन कोलकाता येथील घटनेचा आम्ही डॉक्टर संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत.प्रत्येक व्यक्तीला न्याय मागण्याचा अधिकार असुन तो सनदशीर मार्गाने मागावे माञ डॉक्टरांवर हल्ले करु नयेत अशी अपेक्षा बोलताना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मागण्यांचे निवेदन शिरुर चे तहसिलदार गुरु बिराजदार व पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांना शिरुर शहरातील तीन डॉक्टरांच्या संघटनांच्या वतीने देण्यात आले.यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन(आयएमए)चे अध्यक्ष डॉ.संदिप कोकरे,सचिव डॉ.अमित कर्नावट,नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन(निमा)चे अध्यक्ष डॉ.सुभाष गवारी,सचिव सुरेंद्र ढमढेरे, होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉ.अरुण थोरात,डॉ.शरद ठोंबरे,डॉ.गणेश भडंगे,डॉ.विक्रम घावटे,डॉ.योगेश उपलेंचवार,डॉ.जीवन खोसे,डॉ. आनंद क्षिरसागर,डॉ.अमित घावटे,डॉ.पंकज रोटे,डॉ.योगेश शेळके,डॉ.कल्याणी घावटे,डॉ.स्वाती पानगे,आरती आंधळे,डॉ.नुतन क्षिरसागर आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या