हक्क व अधिकार समजण्यासाठी कायद्याची माहिती हवी

Image may contain: 16 people, people smiling, people standingविठ्ठलवाडी,ता.१९ जुन २०१९(प्रतिनीधी) : ग्रामीण भागातील लोकांना त्यांचे हक्क व अधिकार समजण्यासाठी तसेच कायद्याची माहिती होऊन जनजागृती होण्यासाठी कायदेविषयक शिबीरांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन निवृत्त न्यायाधीश डी. डी. कांबळे यांनी केले.

विठ्ठलवाडी (ता. शिरूर)  येथे पुणे जिल्हा विधी समिती, तालुका पंचायत समिती, घोडनदी बार असोसिएशन व  विठ्ठलवाडी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी निवृत्त न्यायाधीश डी.डी. कांबळे होते.

यावेळी बोलताना कांबळे म्हणाले की  गावातील लहान-सहान तंटे बहुदा गैरसमजातून होतात. अनावश्यक वादविवाद टाळून कायद्याचे  पालन सर्वांनी करणे आवश्यक असून याकरिता शाहू, फुले,  आंबेडकर यांचे विचार सर्वांनी आचरणात आणणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. शिबिराचे उदघाटन संघचालक संभाजी गवारे यांच्या  हस्ते झाले. या शिबिरात ऍड. रंगनाथ थोरात यांनी रस्ते विषयक कायदा, ऍड. नानासाहेब तांबे पाटील यांनी फौजदारी कायदा, ऍड. कांबळे यांनी सर्व समावेषक कायदा, ऍड. प्रदीप बारवकर यांनी महिलांचा कायदा, ऍड. अमित दोरगे यांनी ग्राहक कायदा, ऍड. शांताराम दोरगे यांनी अपघात व मोटार वाहन कायदा या विविध विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. दिपक ढमढेरे, उपाध्यक्ष निलेश कर्डीले, माजी अध्यक्ष ऍड.सुहास ढमढेरे, ऍड शहाजी पाटोळे, ऍड. बाबुराव ढमढेरे, ऍड. सतीश गवारे, ऍड. संपत ढमढेरे, ऍड.पांडुरंग मोरे, माजी उपाध्यक्ष ऍड.डी. एन. भुजबळ, ऍड.एस. टी. भुजबळ, माजी अध्यक्ष ऍड.निवृत्ती वाखारे, माजी अध्यक्ष संजय ढमढेरे, सरपंच ललिता गाडे, पोलीस पाटील शरद लोखंडे, ग्रामसेवक डी.पी.नाथ तसेच मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष ऍड.सुहास ढमढेरे यांनी केले तर ऍड.अजित गवारे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या