शिरुरच्या पुरवठा शाखेत सर्वसामान्यांची होतेय हेळसांड (Video)

Image may contain: 4 people, people standing and indoorशिरुर,ता.२० जुन २०१९(प्रतिनीधी) : शिरुर तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात रेशनकार्ड दुरुस्तीसाठी,नवीन काढण्यासाठी,विभक्त करण्यासाठी व इतर किरकोळ कामे घेउन येणा-या नागरिकांची प्रचंड पिळवणुक होत आहे.

गेल्या तीन  महिन्यांपासुन रेशनकार्डसाठी तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक हेलपाटे मारत असुन नागरिकांना या विभागात कोणीच वाली उरला नाही.'हम करेसो कायदा' या म्हणीप्रमाणे पुरवठा विभागातील कामकाज चालु असुन या अन्यायाविरोधात तालुक्यातील जनतेने कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

महसुल विभागातील सर्वात महत्वाचा समजला जाणारा व सर्वसामान्यांशी निगडित असणारा पुरवठा विभाग याची माञ गेल्या पाच महिन्यांपासुन अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.या ठिकाणी या विभागात तालुक्यातील अनेक नागरिक दुरवरुन वेळ व पैसा खर्च करुन येत असतात.त्यांचे काम होणे हे गरजेचे असताना त्यांना माञ असंख्य हेलपाटे माञ आज मारावे लागत आहे.साधारणत: पाच महिन्यांपुर्वी या विभागातील कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या.तसेच गेल्या १५ वर्षांपासुन रोजदारींवर असणा-या कर्मचा-यांना काढुन त्या जागी महसुल विभागाने कोतवालांची नेमणुक केली.

भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे या उद्देशाने कर्मचा-यांना काढुन टाकण्यात आले असले तरी मुळात ज्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे त्याचा कुठलाही फायदा नागरिकांना होताना दिसत नाही या उलट आगीतुन पडुन फुफाट्यात पडल्याची अवस्था सध्या नागरिकांची झालेली आहे.नागरिकांची बाजु घेणारा तसेच त्यांना न्याय देणारा एकही अधिकारी या विभागात नाही.

उलट रेशनकार्ड बनविणारे कर्मचारी नागरिकांशी अत्यंत उर्मट पद्धतीने वागत असुन त्यांच्याशी अरेरावी,हुज्जत त्यांना वारंवार चकरा मारायला लावणे,तसेच मी म्हणेन तेच खरे असा प्रकार सध्या या पुरवठा विभागात दिसत असुन याला आळा कोण घालणार असा प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.त्यामुळे दाद कोणाकडे मागायची? या कर्मचा-यांवर कोणाचाही अंकुश राहिला नसुन नागरिकांनी या सर्व प्रकरणात नागरिकांना न्याय कोण देणार असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या