नवदांपत्याच्या दागिण्यांवर डल्ला मारणारे दांपत्य गजाआड

Image may contain: 13 peopleपुणे, ता.२० जुन २०१९(प्रतिनीधी) : पुणे जिल्हयातील विविध मंगल कार्यालयात दागिने चोरणारी टोळी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केली असल्याची माहिती पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक संदिप पाटील व गुन्हे शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.

पुणे जिल्हयात विविध मंगल कार्यालयात वधु,वर, व व-हाडी मंडळींचे दागिने चोरीचे घटना घडत होत्या.त्यामुळे गुन्हेगारांना शोधण्याचे पोलीसांना आव्हान निर्माण झाले होते.

या चोरीच्या तपासाच्या अनुशंगाने पथक तयार करण्यात आले होते.सदर पथकाला कसोशीने तपास करत असताना विविध मंगल कार्यालयात वधु,वर, व व-हाडी मंडळींचे दागिने,रोख रक्कम चोरी करणारे नवरा-बायको यवत हद्दीतील समृद्धी मंगल कार्यालयात कारसह येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन विलास मोहन दगडे(वय.२८,रा.खुळेवाडी,चंदननगर), व त्याची पत्नी जयश्री विलास दगडे(वय.२५) यांना ताब्यात घेउन झडती घेतली असता,त्यांच्या ताब्यातील दोन मोबाईल,४ लाख १२  हजार रुपये रोख रक्कम,चार तोळे सोन्याचे दागिने व स्विफ्ट डिझायर कार असा एकुण ८ लाख ९८ हजार रुपये किंमतीचा माल जप्त केला होता.

सदरचा माल त्यांनी सासवड येथील सरस्वती मंगल कार्यालयातुन चोरुन आणल्याचे निष्पन्न झाल्याने अटक करुन सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या तपासात आरोपीने घरात लपविलेले ८८ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ लाख १५ हजार रुपये रोख रक्कम मिळुन आला.
आरोपींनी चोरलेला सदरचा माल सासवड येथील सरस्वती मंगल कार्यालय,वालचंदनगर येथील केतकेश्वर मंगल कार्यालय, भांडगाव येथील आर्यन मंगल कार्यालय, तळेगाव ढमढेरे येथील गिताई मंगल कार्यालय, लोणीकाळभोर येथील मधुबन मंगल कार्यालय व काळभोर लॉन्स, राहु येथील देविका, केडगाव चौफुला येथील दत्त मंगल कार्यालय, उरुळी देवाची येथील स्वराज,  माळेगाव येथील शिवतिर्थ, ओतुर येथील पार्वती, वाघोली येथील सोयरीक, राजगड येथील राधाकृष्ण व लक्ष्मी मंगल कार्यालय,नागरगाव येथील मंगल कार्यालयातुन जबरी चोरी करुन आणले असल्याचे निष्पन्न झालेले आहे

या आरोपींकडुन एकुण ९२ तोळे सोने, रोख रक्कम ५ लाख २७ हजार रुपये, १० मोबाईल व गुन्हयात वापरलेली स्विफ्ट डिझायर गाडी असा एकुण ३७,२७,४३० रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.

आरोपींना पकडण्याकामी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश क्षिरसागर,पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर घोंगडे, जीवन राजगुरु, सहायक फौजदार दत्ताञय गिरमकर, राजु मोमीन, दयानंद लिमन, राम जगताप, महेश  गायकवाड, निलेश कदम, शब्बीर पठाण, श्रीकांत माळी, प्रकाश वाघमारे, खंडु निचीत, मोरेश्वर इनामदार, मुकुंद आयाचित, सचिन गायकवाड, गुरु गायकवाड, सुभाष राउत, प्रमोद  नवले, गणेश महाडिक, रौफ इनामदार, चंद्रशेखर मगर, विशाल साळुंके, विजय कांचन, गुरु जाधव, डोंगरे, बाळासाहेब खडके, एस.एन.कोरफड, एस.पी.मोरे यांनी हि कामगिरी केली.  

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या