शिरुरला शनिवारी आधार कार्ड संदर्भात विशेष मेळावा

Image may contain: one or more peopleशिरूर,ता.२१ जुन २०१९(प्रतिनिधी) : आधार कार्ड नूतनीकरण नवीन आधार काढणे  तसेच दुरुस्ती संदर्भात शनिवारी (दि.22) विशेष मेळावा आयोजित केला असल्याची माहिती शिरूर पोस्ट ऑफिस मधील अधिकारी अमोल शेळके व अमोल साळवे यांनी दिली.

शिरूर शहर व परिसरातील नागरिकांच्या आधार कार्ड अनेक अडचणी आहेत.या अडचणी लक्षात घेऊन  शिरूर पोस्ट ऑफिस  येथे (दि.22) रोजी पुणे ग्रामीण चे डाकघर अधीक्षक बी.पी.एरंडे  यांचे मार्गदर्शनाखाली मेळावा आयोजित केला आहे.या मेळाव्यात आधारकार्ड नूतनीकरण करणे,दुरुस्ती करणे आदी विविध कामे केली  जाणार आहे. त्यामुळे  शिरूर शहर व परिसरातील नागरिकांनी शनिवारी (दि.22)रोजी सकाळी 8:00 ते दुपारी 04:00 या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या