शिरुरला पाणीपुरवठ्याच्या नवीन पाईप लाइनचे भुमिपुजन

Image may contain: 16 people, people smiling, people standing and outdoorशिरुर,ता.२२ जुन २०१९(प्रतिनीधी) : सुमारे ४८ लाख रुपये खर्चुन जलशुध्दीकरण केंद्र ते लाटेआळी अशी पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन पाईप लाईन टाकण्याच्या  कामाचा शुभारंभ नगरपालिकेचे सभागृह नेते व उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

सभागृह नेते प्रकाश धारिवाल यावेळी म्हणाले की लाटेआळी परिसरात पाण्याची मोठी समस्या होती. ही समस्या नवीन पाईपलाईन मुळे मार्गी लागणार आहे.काही महिन्यापुर्वी हे काम मंजूर झाले होते परंतु निवडणूकीमुळे या कामाला उशिर झाला. या परिसरातील पाईपलाईन जूनी झाली होती.त्यामुळे पुरेशा दाबाने पाणी येत नव्हते.माञ नवीन पाईपलाईन नंतर या भागातील विविध प्रश्न मार्गी लागतील.सध्या दुष्काळ असल्याने सध्या सर्वत्र पाण्याची समस्या आहे.या वर्षी पाउस चांगला पडावा अशी अपेक्षा व्यक्त करुन पाणी टंचाईच्या काळात नागरिकांनी केलेल्या सहकार्याबद्दल धारिवाल यांनी आभार व्यक्त केले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती विकास कार्यक्रम योजनेअंतर्गत या पाईप लाईनचे काम करण्यात येणार आहे.या उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, नगरपरिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे सभापती विठ्ठल पवार, बांधकाम समितीचे सभापती सचिन धाडिवाल,शिक्षण समितीचे सभापती मुज्ज्फर कुरेशी,आरोग्य समितीचे सभापती विनोद भालेराव,  नगरसेवक अभिजीत पाचर्णे,संजय देशमुख, संदिप गायकवाड,निलेश गाडेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती सुरेखा शितोळे,नगरसेविका पूजा जाधव, नगरसेविका रोहिणी बनकर, ज्योती लोखंडे, संगीता मल्लाव, मनिषा कालेवार, रेश्मा लोखंडे,   आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष निलेश जाधव, किरण बनकर, मच्छिंद्र जाधव, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख भगवान दळवी आदी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देशमुख यांनी केले. स्वागत नगरसेविका पूजा जाधव यांनी केले तर  अभिजित पाचर्णे यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या