राष्ट्रवादीच्या कुटनितीला बळी पडलो: आढळराव पाटील

Image may contain: 1 person, sittingशिरुर,ता.२२ जुन २०१९(प्रतिनीधी) : शिरुर लोकसभेच्या झालेल्या निवडणुकित राष्ट्रवादीच्या कुटनितीला बळी पडलो असे शिवसेनेचे गटनेते व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी बोलताना सांगितले.

शिरुर लोकसभेच्या निवडणुकिनंतर शिरुर मध्ये प्रथमच आलेल्या शिवाजीराव आढळरावांनी पञकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विविध मुद्दयांवर बाबी स्पष्ट केल्या.

यावेळी बोलताना ते म्हणाले कि, झालेली निवडणुक हि विकासाच्या मुद्दयावर झालीच नाही.दत्तक घेतलेल्या गावांमध्ये मी सर्वाधिक निधी दिला होता.तसेच मतदारसंघात १५ वर्षात कित्येक कोटींची अनेक विकासकामे केली होती,माञ विकासाचा मुद्दा हा बाजुलाच राहिला.राष्ट्रवादीने प्रचारात अनेक खोटे आरोप केले,कपटनितीचा वापर केला परंतु ते राजकारणात अन युद्धात चालतंच.त्यांच्या याच कपटनितीला मी बळी पडलो.

जातीचं समिकरण व संभाजी महाराजांची मालिका या दोन विषयांचा निवडनुकित मोठा फटका बसला.हे सर्व टाळता आलं असतं.प्रत्येक पंचायत समिती गणात जरी ५०० मतांचं लिड मिळालं असतं तरी मोठा फरक दिसला असता.कदाचित मी उमेदवार म्हणुन कमी पडलो असेल,नियोजनात ञुटी राहिल्या असतील, पक्ष कार्यकर्त्यांना लिड करण्यात कमी पडलो असेल परंतु कोणाला दोष देणं हे संयुक्तिक वाटत नाही.पक्षाने मोठी जबाबदारी दिली पराभवाला कवटाळुन बसण्यापेक्षा पक्ष कसा वाढवता येइल, जिथं जिथं गरज असेल तिथं मी योगदान देणार आहे असेही ते म्हणाले.

जातीचं राजकारण १५ वर्षात कधीच केलं नाही.माझ्यावर जातीचं राजकारण केलं असा जो आरोप केला तो विरोधकांचा कट होता.त्या जाळ्यात मी अडकलो.माझ्या विधानाचा विपर्यास करुन कपटनितीनं प्रचारात वापर केला गेला.त्यांनी जातीचं राजकारण केलं मी माञ केलं नाही.एवढं होउनही मतदारसंघातील जनता पुर्वी जेवढी माझ्याकडे कामे घेउन येत होती तेवढी आजही येते.मंञीपदाची खंत आहेच परंतु मंञिपद मिळालं असतं तर एमआयडीसीत नवीन कंपन्या आणता आल्या असता.शिरुर,आंबेगाव मध्ये मोठा प्रकल्प आणण्याचे स्वप्न होते राहुन गेलं. स्थानिकांना त्यामाध्यमातुन रोजगार मिळाला असता.

हि निवडणुक अवघड होती.तरीसुद्धा निवडणुक जिंकेन असा विश्वास होता.संघर्ष करावा लागणार आहे परंतु विजय नक्की आहे याची खाञी होती.प्रतिस्पर्धी उमेदवार वेगळा असता तर चिञ वेगळे दिसले असते.डॉ.अमोल कोल्हे म्हणुन त्यांना मतदान कोणी केलं नाही तर अनेकांनी मालिकेतील पाञाला मतदान करायला जायचे म्हणुन मतदान केले.विरोधकांनी भावनिक खेळ केला.राष्ट्रवादी प्रत्येक अस्ञाचा वापर केला.या निवडणुकित झालेल्या पराभवाबाबत मला कोणाला दोष द्यायचा नाही.या निकालानंतर सगळ्याठिकाणी संघटनेत फेरबदल करण्यात येतील.नवीन कार्यकर्त्यांना संधी देउन नवचैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातील.असेही त्यांनी सांगत पक्षसंघटनेत फेरबदल करण्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी दिले.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी टोकाला गेलेले मतभेद विसरुन एकदिलाने व जोमाने काम केले असे सांगत भाजपच्या सर्वच पदाधिका-यांचे शिवाजी आढळराव पाटील यांनी आभार व्यक्त केले. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या