शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल

No photo description available.वाघोली, ता. 22 जून 2019 (प्रतिनिधी) : रांजणगाव (ता. शिरुर) येथील औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या स्क्रॅबचा ठेका घेतल्यावरुन एका महिलेचा विनयभंग करुन तिच्या पतीस मारहाण करण्यात आल्याने लोणीकंद (ता. हवेली) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून शिवसेनेच्या युवा सेनेचा जिल्हाप्रमुखासह एक माजी सरपंच आणि अन्य दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे, रांजणगाव येथील एका कंपनीत संबंधित महिलेच्या पतीला एक महिन्यापुर्वी स्क्रॅबचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. रांजणगाव येथील शिवसेनेच्या युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बाप्पू शिंदे यांच्याकडे पुर्वी हे कॉन्ट्रॅक्ट होते. त्यामुळे बाप्पू शिंदे यांच्या सांगण्यावरुन निमोणेचे माजी सरपंच विजय भोस, तसेच करडे येथील हॉटेल गुरुदत्त हॉटेलचे मालक गणेश वाघमारे आणि प्रविण वाळके असे तिघे जण वाघोली येथे तक्रारदार महिलेच्या पतीच्या ऑफिसमध्ये (ता. १९) रोजी सायंकाळी 5:30 वाजता गेले. त्यावेळी संबंधित महिलेचा पती बाहेर गेला होता. त्यावेळी विजय भोस याने तक्रारदार महिलेला "आम्ही बाप्पू शिंदे याच्या सांगण्यावरुन येथे आलो असून MIDC तल्या कंपनीच्या स्क्रॅबच कॉन्ट्रॅक्ट तुम्ही का घेतले? असे म्हणून विनयभंग केला. त्याच वेळी त्या महिलेचा पती बाहेरुन आला. त्यावेळी प्रविण वाळके याने हातातली काठी त्या महिलेच्या पतीच्या डोक्यात मारली. तसेच गणेश वाघमारे याने संबधित महिलेच्या पतीच्या गळ्यातील तीन तोळ्याची चैन हिसकावून काढून घेतली व  त्यांच्या ऑफिसमध्ये तोडफोड केली.

त्यामुळे बाप्पू शिंदे, विजय भोस, गणेश वाघमारे, प्रविण वाळके या चौघांविरोधात लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये आय पी सी कलम १०९, ३५४, ३२७, ४२७, ५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. बाप्पू शिंदे याच्यावर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये यापुर्वी काही गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास हनुमंत पडळकर हे करत आहेत.

दरम्यान, संबंधित महिलेचा पती पत्रकार असून, त्या महिलेने मुख्यमंत्र्यांकडे या विषयी पत्र लिहून दाद मागितली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या