वसेवाडी शाळेतील १४ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

Image may contain: 20 people, people smiling, people standing
सणसवाडी, ता. 3 जुलै 2019 (निलेश पोपळघट) : येथील वसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शिष्यवृत्ती परिक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. येथील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत कु. भाग्यश्री योगेश काळे हिने ३०० पैकी २८४ गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक मिळविला आहे.

शाळेतील १३ विद्यार्थ्यांनी २२२ पेक्षा जास्त गुण मिळवीत जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. यात साक्षी वजाळे, बालाजी भंडारे, योगेश काशीद, आर्या रोडे, कार्तीक चांगुलपाई, दीपाली ओव्हाळ, पद्मावती भंडारे, निकिता जाधव, अंकिता जडे, अपेक्षा गव्हाणे, समीक्षा भोसले, महेश काशीद, जयेश अडागळे यांचा समावेश आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना ज्योती गायकवाड, संतोष तांबे यांनी मार्गदर्शन केले. याबाबत शाळेचे विद्यमान मुख्याध्यापक संतोष गोसावी सर यांनी माहीती दिली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचे शिरुर पंचायत समितीच्या माजी उपसभापती मोनिका हरगुडे, ग्रा.पं. सदस्या सुनिता दरेकर, नवनाथ हरगुडे, मार्केट कमिटीचे संचालक दत्ताभाऊ हरगुडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष वैभव यादव, जिजामाता बॅंकेचे संचालक पंडित दरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष हरगुडे आदींनी अभिनंदन केले.


पायल मांढरे शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत
Image may contain: 5 people, people smiling, people standing and outdoor
भांबर्डे, ता. 2 जुलै 2019: येथील न्यू इंग्लिश स्कुल मधील पायल भाऊसाहेब मांढरे या विद्यार्थीनीने माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत १६९ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत दुसरा क्रमांक मिळविल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम यांनी दिली.

या विद्यार्थीनीस उत्तम गाडे, सुरेश शेळके, बाळासाहेब दिवेकर आणि सविता शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनीचे आणि शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे, उपाध्यक्ष मच्छिंद्र पवार, संचालक हनुमंत पवार, नाथु वीर तसेच ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले.


धानोरे जि.प.शाळेचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र
Image may contain: 12 people, people smiling, people standing, shoes and outdoorधानोरे, ता. 28 जून 2019 (एन.बी.मुल्ला): येथील जि.प.शाळेचे तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्याची माहिती मुख्याध्यापक शंकरराव शिंदे यांनी दिली.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत धानोरे (ता.शिरूर) येथील जि.प.प्राथ.शाळेने यशाची परंपरा कायम राखली असून तीन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकली आहेत. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी पुढीलप्रमाणे: साहिल धनंजय तनपुरे (२५० गुण), माणस अशोक कामठे (२३४ गुण), श्रेया नितीन कामठे (२३२ गुण).या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक बाळासाहेब रसाळ यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान पंचायत समितीच्या सदस्या अर्चना भोसुरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश चकोर, उपाध्यक्षा मंगल कामठे, संभाजी भालेराव यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.


वाघाळे येथील शाळेतील तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत
Image may contain: 8 people, people smiling, people standing and outdoorवाघाळे, ता. 27 जून 2019: येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेतील पाचवीच्या तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांचे अभीनंदन केले आहे.

अमृता दिलीप थोरात (248), वेद बाळासाहेब शेळके (248), समिक्षा विठ्ठल घोलप (228) गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले आहेत. त्यांना दिलीप थोरात यांनी मार्गदर्शन केले आहे. या शाळेतील 97 विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षात चमकले आहेत. जिल्हा क्रिडा स्पर्धेत तीन वेळा प्रथम क्रमांक पटकावला आहे.

पारोडी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत दैदीप्यमान यश
Image may contain: 8 people, people standing and outdoorपारोडी, ता. 25 जून 2019 (एन.बी.मुल्ला): येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे ६ विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.

शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे :- वेदांत दत्तात्रय वडघुले (२८२ गुण राज्यात ७ वा), ओंकार रेवणनाथ सातकर (२५८ गुण), ओम रामदास वडघुले (२५८गुण), प्रतीक बापू टेमगिरे (२५२गुण), साहिल राजेंद्र ढमढेरे (२३० गुण), निखिल गौतम भालेराव (२२४ गुण). या सर्व विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक गोरक्ष काळे व मुख्याध्यापक गुलाब घोलप यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे शिरूर बाजार समितीचे संचालक विकासआबा शिवले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी टेमगिरे, सरपंच नीलिमा सातकर, उपसरपंच नीता भोसले, गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, विस्ताराधिकारी वंदना शिंदे, केंद्रप्रमुख रामदास विश्वास यांनी अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या