शेतकरी संघटनेचे अशोक शितोळे यांचे अपघाती निधन

Image may contain: 1 personमांडवगण फराटा,ता.२६ जुन २०१९ (प्रतिनीधी) : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अशोक (बाप्पू) सीताराम शितोळे यांचे अपघाती निधन झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मंगळवार दि.२५/६/२०१९ रोजी संध्याकाळी ९ ते ९:३० वाजता दरम्यान मोटार सायकल क्र. (एम.एच.१२ एफ.जी.९०७४) या मोटार सायकल वर अशोक शितोळे हे वडगाव रासाई ते मांडवगण फराटा रस्त्याने मांडवगण फराटा येथे येत असताना हॉटेल शिवरत्न च्या जवळ मोटार सायकल एम.एच.१२ सी.एस.११०३ यांची सामोरा समोर जोरदार धडक होऊन रस्त्यावर पडले. नाकातून रक्तस्राव होऊन जागेवरच मयत झाले. या सर्व घटनेची माहिती त्यांचे भाचे प्रमोद कदम यांनी मांडवगण फराटा पोलीस स्टेशनमध्ये दिली. या प्रकरणी पोलीसांनी मोटार सायकल क्र. एम.एच.१२ सी.एस.११०३ या चालका विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रीतसर पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह न्हावरा येथे शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. पुढील तपास मांडवगण फराटा पोलीस स्टेशनचे अधिकारी व त्यांचे सहकारी करीत आहेत.

कै. अशोक सीताराम शितोळे हे सन २००१ पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे काम करीत होते. त्यांनी शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या बरोबर कामाला सुरुवात केली. पुढे संघटना वेगळी झाल्यावर राजू शेट्टी यांच्या बरोबर शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करीत होते. कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांचे ते जवळचे मित्र होते. सन २००३ साली शेतकरी संघटनेचे सर्वात मोठे आंदोलन झाले होते, त्यावेळी त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांच्या अपघाती निधनाने एक शेतकऱ्यांचा मोठा आधार संपल्याने शेतकरी व मित्र परिवार हळहळ व्यक्त करीत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या