पुणे-नगर महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू

No photo description available.शिरुर, ता. २६ जुन २०१९ (प्रतिनीधी) : पुणे-नगर रस्त्याने जाणा-या दुचाकीस्वाराची ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकल्याने गंभीर मार लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.

या अपघातात रावसाहेब पोपट दौंडकर(वय.४५,रा.बो-हाडेमळा,ता.शिरुर) यांचा दुर्दैवी मृत्यु झाला असुन अमोल बो-हाडे यांनी फिर्याद दिली आहे. शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार(दि.२६) रोजी रावसाहेब दौंडकर यांचा सकाळी सव्वा आठच्या सुमारास दुध घालायला जात असताना पुणे-नगर महामार्गावर बो-हाडेमळा नजीक रोडच्या कडेला त्यांची दुचाकी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकुन अपघात झाला. या अपघातात रावसाहेब यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना सरकारी दवाखान्यात उपचाराकामी नेण्यात आले परंतु उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले.

या प्रकरणी शिरुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक वैभव मोरे हे करत आहेत.  

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या