चोरट्यांच्या घरफोडीत ५ लाख ६७ हजारांचा ऐवज लंपास

No photo description available.शिरुर, ता.२७ जुन २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर येथे अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत सुमारे ५ लाख ६७ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी अतिक इब्राहिम शेख यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामानिमित्त मुंबईला गेले असता व फिर्यादी यांच्या पत्नी या दोन मुलांसह माहेरी गेल्या होत्या. फिर्यादी अतिश यांनी पत्नी यांनी राञी घरी येणार असल्याचे सांगितल्याने फिर्यादींच्या पत्नी यांनी घरी जाउन पाहिले असता घराचे दरवाजाची कडी तुटलेली दिसली. यावेळी आत जाउन पाहिले असता चोरी झाल्याचे समजते.

या चोरीत चोरट्यांनी १ लाख २५ हजार रु.किंमतीचे ४६ ग्राम वजनाचे सोन्याचे नेकलेस, २० ग्राम वजनाचे ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे नेकलेस, ४० ग्राम वजनाच्या १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ६० हजार रुपये किंमतीच्या दोन २० ग्रामच्या सोन्याच्या बांगड्या, १५ हजार रुपये किंमतीचे कानातील सोन्याच्या रिंगा, ४५ हजार रुपये किंमतीचे दोन १५ ग्रामच्या कानातील सोन्याचे झुबके, दोन ३० हजार रुपये किंमतीचे १० ग्राम वजनाचे कानातील झुबके, ६० हजार रुपये किंमतीच्या तीन बोटातील अंगठ्या, ३ हजार ५०० रुपये किंमतीचे २२ ग्राम वजनाचे चांदीचे ११ दिवे, १ हजार ५०० रुपये किंमतीचे  चांदीच्या हातातील कडा, रोख रक्कम ५२ हजार, ५ हजार रुपये किंमतीची तिजोरी व इतर कागदपञे असा सर्व मिळुन ५ लाख ६७ हजार रुपये किंमतीचा माल अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन चोरी करुन नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी शिरुर पोलीसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे  हे करत आहेत. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या