संकेतस्थळाच्या बातमीनंतर त्या कर्मचा-याची हकालपट्टी

Image may contain: 4 people, people standing and indoor
शिरुर, ता. २७ जुन २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर तहसिल कार्यालयातील पु्रवठा विभागाचा सावळा गोंधळ संकेतस्थळ www.shirurtaluka.com ने चव्हाट्यावर आणल्यानंतर त्या कर्मचा-याची पुरवठा विभागातुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिरुर तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात जुन्या कर्मचा-यांच्या बदल्यानंतर नवीन नेमणुक प्रशासनाने केली होती. माञ येथील नेमणुकीनंतर भ्रष्टाचार थांबण्याऐवजी नागरिकांची मोठी परवड झाली. अनेकांना वेळेत रेशनकार्ड मिळण्याऐवजी अनेक चकरा माराव्या लागत होत्या.

पुरवठा विभागात मोठा सावळा गोंधळ माजला होता. या संदर्भात संकेतस्थळ www.shirurtaluka.comने व्हिडीओसह वृत्त प्रसिद्ध केले होते. या बातम्यांची दखल घेत तहसिलदार गुरु बिराजदार यांनी सदरील कर्मचा-याची हकालपट्टी करत त्याची नेमणुक त्याच्या सजाच्या ठिकाणी केली.

दरम्यान प्रत्येक गावातील नागरीकांना रेशनकार्ड मिळण्यास विलंब झाल्याने नागरीकांना त्यांच्या गावामध्येच कोतवालांमार्फत रेशनकार्ड मिळणार असल्याचे तहसिलदार गुरु बिराजदार यांनी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या