निमगाव म्हाळूंगी ते रांजणगाव रस्त्याचे काम लवकरच...

Image may contain: outdoor and nature
निमगाव म्हाळुंगी, ता. 1 जुलै 2019 (आकाश भोरडे): 'निमगाव म्हाळूंगी ते रांजणगाव रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी?' या मथळ्याखाली www.shirurtaluka.comने वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे.

निमगाव म्हाळूंगी ते रांजणगाव गणपती (ता. शिरूर) या अष्टविनायक महागणपती पालखी सोहळ्याच्या मार्गाची गेल्या काही दिवसांपासून खूप मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. या पालखी सोहळ्याबरोबर अनेक भाविक भक्त व बालगोपाळ निमगाव म्हाळूंगीतील श्रीशिरसाई देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्याचबरोबर शिरूर,रांजणगाव आणि कारेगाव या ठिकाणी जाण्यासाठी लोक याच रस्त्याचा वापर करत होते. परंतु या रस्त्यात मोठ मोठे खड्डे पडल्याने व त्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत होता.

याबाबत 'www.shirurtaluka.com' या संकेतस्थळावर 'निमगाव म्हाळूंगी ते रांजणगाव रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी?' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाल्याने याची दखल घेत रांजणगाव गणपती ते निमगाव म्हाळूंगी (ता.शिरूर) या पालखी सोहळा मार्गासाठी 'नाबार्ड' मधून सुमारे दोन कोटी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली.

निधी मिळाल्याने लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. ग्रामस्थांची आणि पालखी सोहळ्यातील भाविकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रस्त्याच्या निधीची तरतूद केली असून, लवकरच काम सुरू होणार असल्याचे आमदार पाचर्णे यांनी सांगितले.

निमगाव म्हाळूंगी ते रांजणगाव रस्त्याच्या कामाला मुहूर्त कधी?
निमगाव म्हाळुंगी, ता. 29 जून 2019 (आकाश भोरडे): निमगाव म्हाळूंगी ते रांजणगाव गणपती (ता.शिरूर) या रस्त्याची अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, या रस्त्याच्या कामाचे व दुरूस्तीचे लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासने दिली जात आहेत. परंतु अद्याप पर्यंत या रस्त्याच्या कामाला मुहूर्त सापडला नाही.

या रस्त्याने रांजणगाव गणपती येथील श्री महागणपतीची पालखी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवात निमगावातील शिरसाईदेवीच्या भेटीसाठी येते. या पालखी सोहळ्याबरोबर आसपासच्या परिसरातील भाविक भक्त व बालगोपाळ मोठ्या संख्येने शिरसाईदेवीच्या दर्शनासाठी येत असतात. तसेच शिरूर, रांजणगाव, कारेगाव येथील औद्योगिक कंपनीमध्ये कामाला असणार्‍यांना याच रस्त्याने जावे लागते.

या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी खड्डे पडुन त्यात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे दुचाकी चालकांना गाडी चालवताना तारेवरची कसरत करावी लागते. तरी या रस्त्याची लवकरात लवकर दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या