पत्रकारांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

Image may contain: 19 people, people smiling, people standing
तळेगाव ढमढेरे, ता. 29 जून 2019 (आकाश भोरडे): येथील समता विद्यार्थी वस्तीगृहात गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शिरूर यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

दरवर्षी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना पत्रकार संघाच्या वतीने शिरूर तालुक्यात विविध ठिकाणी वह्या वाटप, युवा पुरस्कार प्रधान असे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्या अनुषंगाने यावर्षी तळेगावच्या परिसरात कार्यक्रम व्हावा अशी मागणी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची होती, त्यानुसार अनाथ मुलांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शिरूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विश्वासकाका ढमढेरे अध्यक्षस्थानी होते.

समाजातील ज्वलंत प्रश्न पत्रकारांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सोडवलेले असून, समाजातील सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणाने पत्रकार करत असतात. आपण गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत आहात, सर्वसामान्यांना न्याय देण्याचे उत्कृष्ट कौतुकास्पद काम पत्रकार करत असल्याचे प्रतिपादन शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विश्वास ढमढेरे यांनी केले. यावेळी शाळेत आलेल्या पाहुण्यांचा सत्कारावेळी 'बुके नको, बुक द्या' याचा अवलंब करत शाल किंवा नारळ यांना फाटा देत वैचारिक पातळी आणि ज्ञान वाढावे या दृष्टीने पुस्तके भेट देण्यात आली.या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक करून स्वागत केले.

यावेळी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विश्वास ढमढेरे, तळेगाव ढमढेरेचे उपसरपंच विजय ढमढेरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शेरखान शेख, कोषाध्यक्ष जालिंदर आदक, विशाल वरपे, आकाश भोरडे, अतुल थोरवे आदी पत्रकार व मुख्याध्यापक अशोक वाडीले वसतिगृहाचे अधीक्षक शंकर मनोळी, स्वराज्य श्री संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप गोसावी, अधीक्षिका विजया अहिरे, केशव पवार, शंकर शिंदे, विजया भोर व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप गोसावी यांनी केले तर आभार शेरखान शेख यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या