शिरूरला पारधी समाजाच्या मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन

Image may contain: one or more people, people sitting and outdoor
शिरूर, ता. 30 जून 2019 (संपत कारकूड): पारधी समाजातील विविध मलभूत मागण्या मान्य होण्यासाठी शिरूर तहसिलदार कार्यालयाच्या आवारात समाजातील नेते हिरालाल भोसले यांनी बेमुदत आंदोलन छेडले आहे.

भ्रष्टाचारासाठी अव्वल असणारे महसुल खाते तसेच ग्रामपंचायत स्तरावरील विविध अनियमित कामकाजावर बोट ठेवून गेली पाच वर्षांत जो काही भ्रष्टाचार झालेला आहे. त्याची पारदर्षकपणे चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी हे आंदोलन छेडले असल्याचे भोसले यांनी www.shirurtaluka.com सोबत बोलताना सांगितले.

आंदोलनातील प्रमुख मागण्यांपैकी मांडवगण फराटा येथील सरकारी गायरान व गावठाण जागेवर बेकायदेशीरपणे केलेले अतिक्रमणाचा मुद्या तसेच गावातील वेगवेगळया निधीचा गैरवापर, गावातील मुख्य रस्त्यावरील टपऱयांद्वारे गावचे बकालपण कमी करणे, गावात मटका, जुगार व बेकायदेशीर धंदे त्वरित बंद करण्यात यावेत इत्यादी प्रमुख मागण्या आहेत.

हिरालाल भोसले यांनी यापुर्वीही गावात अमरण उपोषण करुन यातील काही मागण्या मान्यही करुन घेतल्या होत्या. परंतु, त्याची अद्याप कसली कार्यवाही झालेली नाही. सध्या ते पत्नी तसेच तीन मुले घेवून तहसिल कार्यालय शिरूर येथे आंदोलन करीत असून, शासनाने माझ्या मागण्यावर गांभीर्याने विचार केला नाही तर संपूण पारधी समाज कार्यालयसमोर पाल ठोकून आणोखे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या