मांडवगणमध्ये बिबटया पिंजऱ्यामध्ये जेरबंद (Video)

No photo description available.मांडवगण फराटा, ता.२ जुलै २०१९ (राजेंद्र बहिरट) :  मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथे आज पहाटे बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाल्यानंतर नागरिकांनी सोडला मोकळा श्‍वास घेतला.


गेले अनेक दिवसांपासून या परिसरामध्ये बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते.मांडवगण फराटा येथील एन डी दादा फराटे यांच्या वस्तीवर वन विभागाने गेले दोन दिवसापासून लावलेल्या पिंजऱ्यामध्ये मंगळवार (दि.2) रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या भक्ष्याच्या शोधात जेरबंद झाला.याच वस्तीवर गेले सहा महिन्यापूर्वी एक बिबट्या जेरबंद झाला होता.बिबट्या जेरबंद होण्याची ही या वस्तीवरची दुसरी घटना आहे. त्यामुळे अजून या परिसरामध्ये किती बिबट्या आहेत असा प्रश्‍न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मांडवगण फराटा परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढला होता तसेच या परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्यामेंढ्या ठार केले आहेत.रात्री-अपरात्री शेतामध्ये पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना बिबट्या अनेक वेळा निदर्शनास आला होता त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळेस पाणी देण्यासाठी धजावत नव्हते,परंतु बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या