अनैतिक संबधास नकार दिल्याने महिलेची हत्या

शिरूर, ता. 3 जुलै 2019 : अनैतिक संबंधास नकार दिल्याच्या रागातून अविवाहित युवकाने विवाहित महिलवर चाकूने वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी युवकास पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोहकडी येथील विवाहीत महिला संध्या सुभाष गव्हाणे (वय 24 रा. कोहकडी, ता. पारनेर) यांच्यावर त्यांच्याच घरासमोर राहणारा गोविंद उर्फ पप्पू सुरेश चव्हाण हा युवक संध्या यांच्यावर वाईट नजर ठेवत होता. त्या पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर तो छेडछाड काढत असे. शिवाय, शरीरसंबंधाची मागणी करून आपण दोघे पळून जाऊ, असे म्हणत होता. संध्या यांनी याबाबतची माहिती पतीला सांगितली होती. संध्या यांचा पती सुभाष गव्हाणे यांनी गोविंद उर्फ पप्पू व त्याच्या आई-वडिलांना या बाबत दोन वेळा समजावून सांगितले होते. तरीही गोविंद हा संध्याला सतत त्रास देत होता.

संध्या यांच्याकडून गविंद यास अनैतिक संबंधास विरोध केल्याच्या रागातून गोविंद याने शुक्रवारी (ता. 28) सायंकाळी सात वाजणेच्या सुमारास संध्या पाणी भरण्यासाठी आली असता गोविंदाने चाकूने वार केले व पळून गेला. गंभीर जखमी अवस्थेतील संध्या यांना उपचारासाठी तातडीने शिरूर येथील सरकारी रूग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी संध्या यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. संध्या यांचा पती सुभाष राजू गव्हाणे यांच्या तक्रारीवरून गोविंद उर्फ पप्पू सुरेश चव्हाण याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या