विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून 'हे' चारच उमेदवार इच्छुक

No photo description available.
शिरूर, ता. 5 जुलै 2019: राष्ट्रवादी काँग्रसने पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांकडून मागविले होते. शिरूर-आंबेगाव व शिरूर-हवेली मधून फक्त चारच उमेदवार इच्छुक आहेत, असे दिसून आले.

आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांना डावलून कोणीही उमेदवारी मागण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे तेथे प्रत्येकी एकच अर्ज आला आहे, तर शिरूर-हवेलीमधून चार अर्ज आले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाही.

कंद हे नुकत्याच झालेल्या वाडेबोल्हाई पंचायत समिती गणाच्या निकालानंतर पक्षावर चिडलेले होते. येथे पक्षाचा अधिकृत उमेदवार पराभूत झाला. पक्षातील अंतर्गत विरोधकांनीच हा पराभव घडवून आणल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे होते. बांदल यांचेही असेच घडले आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकलेला असताना पक्षाकडे तसा अर्ज का केला नाही, याचे कोडे त्यांच्या समर्थकांना पडले आहे. शिरूर तालुक्यामध्ये चर्चांना उधान आले आहे. बांदल राजकीय करामती करण्यात पटाईत असल्याने ते आता काय भूमिका घेणार?, याची मतदारसंघात उत्सुकता लागली आहे.
 
मतदारसंघनिहाय इच्छुकांची नावे पुढीलप्रमाणे :

आंबेगाव : दिलीप वळसे-पाटील

शिरूर हवेली :
  1. अशोक पवार
  2. चंदन सोंडेकर
  3. वसुंधरा उबाळे

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या