Bigg Boss च्या घरात सुरेखा पुणेकरांना मानाचा मुजरा

Image may contain: 2 people, people smiling, people standing
शिरूर, ता. 8 जुलै 2019: महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या. वीक एंडचा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी सुरेखा पुणेकर एलिमिनेट झाल्याचे जाहीर केले.

बिग बॉस मराठीच्या घरात संपूर्ण आठवडाध्ये अतिथी देवो भव: हा टास्क रंगला आणि ज्यामध्ये बिग बॉस मराठी सिझन १ मधील सदस्य घरामध्ये गेस्ट बनून आले. या टास्कमध्ये नेहाच्या टीमने बाजी मारली. या आठवड्यात सुरेखा पुणेकर यांना कमी मतं मिळाल्यामुळे घराबाहेर जावे लागले. हिना पांचाळ, रुपाली भोसले, वैशाली म्हाडे, किशोरी शहाणे आणि सुरेखा पुणेकर हे नॉमिनेशनमध्ये होते. ज्यामध्ये  वैशाली म्हाडे आणि सुरेखा पुणेकर हे डेंजर झोनमध्ये होते. मात्र अखेर महेश मांजरेकरांनी सुरेखा ताईंना घराबाहेर येण्यास सांगितलं. संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकणाऱ्या सुरेखा यांनी घरातील स्पर्धकांची आणि प्रेक्षकांचीही मनं जिंकली.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सुरेखा पुणेकर म्हणाल्या, 'मी सहा आठवडे या घरात राहिले याचा मला अभिमान आहे. घरातील सगळ्यांनी मला जो मान दिला त्यासाठी मी आनंदी आहे.' घरातील सदस्यांच्या मनात त्यांच्याविषयी नेहमीच आदर होता आणि राहील. सुरेखाताई घरातून बाहेर पडताना सगळेच सदस्य भावुक झाले. सगळ्या सदस्यांनी सुरेखाताईना मानाचा मुजरा केला आणि 'ही सुरेखा आपल्याला पटलेली आहे,' असे म्हटले. सुरेखा ताईंनी घरातल्या सदस्यांना दिलेले नृत्याचे धडे, त्यांनी सादर केलेली लावणी, मजा- मस्ती, त्यांनी वेळोवेळी दिलेला आधार सदस्यांना घरामध्ये नक्कीच आठवेल. यावेळी सुरेखा पुणेकरांना त्यांच्या आतापर्यंतच्या घरातील प्रवासाची एक सुंदर व्हिडिओ दाखविण्यात आला. महेश मांजरेकर यांनी सुरेखा ताईंना एक विशेष अधिकार दिला ज्यामध्ये त्यांना घरातील एका सदस्याला अनसेफ करायचे होते पण त्यांनी असे करण्यास साफ नकार दिला.

या आठवड्यात वैशाली, रुपाली, हीना, किशोरी आणि सुरेखा पुणेकर नॉमिनेशन प्रक्रियेत सहभागी होत्या. त्यापैकी वैशाली आणि सुरेखा पुणेकर डेंजर झोनमध्ये आल्या आणि आजच्या भागात सुरेखा पुणेकर बाहेर पडल्या.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या