शिरसगावला पशुवैद्यकिय दवाखान्याचे उद्घाटन

Image may contain: 4 people, people smiling, people standingशिरसगाव काटा,ता.१० जुलै २०१९(प्रतिनीधी) : शिरसगाव काटा येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी २ च्या स्थलांतरित दवाखान्याचे उदघाटन राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Image may contain: 4 people, indoorराज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते पशुसंवर्धन दवाखान्याचे उद्घाटन झाल्यानंतर जाणकर यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच अडचणीही जाणुन घेतल्या.ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधुन त्यांचा सत्कार करण्यात आला.

शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास शिरूर तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष भगवान शेळके,माजी जि.प सदस्य दादासाहेब कोळपे, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, सदस्य आबासाहेब सरोदे, सरपंच शोभाताई कदम,भाजपा संपर्क प्रमुख अॅड.धर्मेंद्र खांडरे, तहसीलदार गुरू बिराजदार, प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ माधव आठवले,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ शितलकुमार मुकणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ शिवाजी विधाटे, माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ कदम, माजी सरपंच भरत चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष शिवाजीराव कुऱ्हाडे, युवा जिल्हाध्यक्ष सागर गोरे, रामकृष्ण बिडगर,महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैजयंती चव्हाण,घोडगंगाचे माजी संचालक कैलास सोनवणे, पोलिस पाटील भाउसाहेब गायकवाड,मा.सरपंच सतिश चव्हाण, आबासाहेब कदम,संदिप देवकाते,नितिन कदम,सागर गराडे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या