पशुसंवर्धन मंञी जानकरांचा असाही साधेपणा...

Image may contain: one or more peopleन्हावरे,ता.११ जुलै २०१९(संजय बारहाते) : मंञी होण्यापुर्वी शिरुर तालुक्यातील सर्वसामान्यांशी आजही घट्ट नाळ असलेल्या महाराष्ट्रातील या मंञ्याच्या या अनोख्या राहणीमानामुळे तळागाळात ते लोकप्रिय आहेत.

महाराष्ट्र राज्याचे दुग्धविकास, मच्छ व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर साहेब जुन्नर, शिरूर तालुक्यांच्या दौऱ्यावर नुकतेच येउन गेले. जुन्नर मधुन सकाळपासुन विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटने करीत दुपारी शिरूर तालुक्यात पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांचे उद्घाटने पशुसंवर्धन व दुग्धविकासमंञी महादेव जाणकर यांच्या हस्ते पार पडली. संपुर्ण दिवसभर अंत्यत व्यस्त कार्यक्रम असताना व वेळेत सर्व कार्यक्रमे उरकायची असल्याने जाणकरांना जेवायला पण वेळ मिळाला नाही. 

मंञी होण्यापुर्वीही शिरुर तालुक्यातील तळागाळातील जनतेशी घट्ट नाळ असल्याने व तालुक्याची खडानखडा माहिती असल्याने जानकरांचे अनेकांकडुन उत्स्फुर्तपणे स्वागत केले जात होते.दरम्यान कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव रांजणगाव सांडस मधील कार्यक्रम उरकून केडगाव कडे जाताना, गाडीतच जाणकरांनी भाकरीवर बटाट्यांचे भरीत घेत जेवन उरकले.जेवायला थांबलो तर पुढचे कार्यक्रम वेळेत होणार नाही केडगाव, फलटण येथे लोक वाट पहात असे म्हणत गाडीत चर्चा करीत असताना समाजाच्या प्रश्नाबाबत असलेली तळमळ मात्र बोलण्यातुन स्पष्ट जाणवत होती.अंत्यत साधी राहणी, ना मंत्री पदाचा बडेजाव, ना डामडौल, आमदार होण्यापुर्वी वाडी वस्तीवर हिंडणारे, नावानिशी ओळखणारे, सामान्य माणसाशी नाळ टिकऊन ठेवणारे जाणकर अशा साध्या राहणीमानामुळे माञ शिरुर तालुक्यात चांगलेच लोकप्रिय आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या