शिरुरच्या कृषी विभागात "आंधळं दळतयं..नी.."

Image may contain: outdoorशिरुर,ता.१२ जुलै २०१९(मुकुंद ढोबळे) : शिरूर तालुक्यात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कृषी कार्यालयाची अवस्था दयनीय झाली असून अवघ्या चार कर्मचा-यांवर तालुक्याचा गाडा हाकला जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

शिरुर तालुकयाचे कृषी विभागाचे कामकाज हे तालुका कृषी विभागामार्फत सांभाळले जाते.या विभागासाठी तालुका कृषी अधिकारी, वरिष्ठ लिपिक,लिपिक, सहाय्यक कृषी अधीक्षक, मंडल कृषी अधिकारी ,कृषी सहाय्यक, शिपाई, मिळून एकूण 80 कर्मचारी शिरूर तालुका कृषि कार्यालय अंतर्गत तालुक्यांमध्ये शासनाकडून देण्यात आले आहेत.माञ सुमारे 16 लोकांचा कर्मचारी वर्ग असणाऱ्या कृषी कार्यालयात सध्या 4 कर्मचारी तालुक्याचा कार्यभार सांभाळत आहे. तर तालुका कृषी अधिकारी हे प्रमुख पद रिक्त आहे.तसेच शेतकर्याच्या दारात जाऊन काम करणाऱ्या याच खात्यातील 64 कर्मचारी पैकी17 कर्मचारी पदे रिक्त आहे.तालुक्यातील या कृषी कार्यालय व फिल्डवर काम करणारे असे मिळून 29 पदे रिक्त आहेत, तर तालुक्यातील दहा गावांना कृषी सहाय्यकच नाहीत.या खात्याची अवस्था "विना सेनापती व सैनिकांविना अशी असुन शिरूर तालुका कृषी कार्यालय सुरू असून कार्यालयातील अनेक पदे रिक्त असल्याने हे शिरूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय रामभरोसे असल्याचे दिसून आले आहे. तर तालुक्याला कृषी अधिकारीच नसल्याने कार्यालय सुमसाम झाले असल्याचे वास्तव समोर आले आहे.

शिरूर तालुक्यात सर्वात महत्त्वाचे कृषी खाते असून कृषी खात्यामार्फत शिरूर तालुक्यात खते देने, अवजारे देने, ट्रॅक्टर देने, शेतीतील विमा योजना,  केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या अनेक योजना याच खात्यातून शेतकरी वर्गाला दिल्या जातात.या विभागाला शिरूर तालुक्याचा आत्मा असे म्हणुन ओळखले जाते.तालुक्यातील सर्व गावांच्या शेतीची इतंभूत माहिती, झालेल्या पेरण्या ,निघालेली उत्पन्न, शासनाच्या नवीन योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणे, शेतीचे पिक विमा योजना राबविणे, यासह अनेक कामे कृषी कार्यालयाच्या मार्फत केली जातात.


शिरूर तालुका कृषी कार्यालयात तालुक्याच्या संपूर्ण कार्यभार व त्याची माहिती गोळा केली जाते.या साठी शिरूर तहसील कार्यालय येथे तालुका कृषि कार्यालय असून या कार्यालयांमध्ये एकूण 16 कर्मचारी काम करण्यासाठी शासनाच्या वतीतने नेमणूक केली आहे. त्यात तालुका कृषी अधिकारी, 1 वरिष्ठ लिपिक, 4 लिपिक, एक कृषी सहाय्यक अधीक्षक, एक कृषी पर्यवेक्षक,चार शिपाई अशी 16 पदे कार्यालयात आहे. परंतु संपूर्ण कार्यालय सध्या चारच कर्मचारी चालवत आहे. एक कृषि सहाययक, शिपाई,अनुरेखक एवढेच पदे सध्या कार्यालयात असून इतर बारा पदे रिक्त असून यामुळे राज्य, जिल्हा कृषी खात्याचा भोंगळ कारभार सुरू असल्याचे दिसून आले आहे. नेमके राज्य आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय करते काय हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

त्याचबरोबर तालुक्याच्या शेतीच्या बांधावर जाऊन काम करणारे कृषी साहाय्यक ही एकूण48 पदे तालुक्याच्या विविध भागात नेमून दिली आहे,चार मंडल अधिकारी,8 कृषी अधिकारी, चार शिपाई, 4 अनुरेखक यात ही दहा कृषी सहाय्यक पदे रिक्त,मंडल कृषी अधिकारी एक रिक्त, तीन शिपाई रिक्त,3अनुरेख रिक्त आशा फिल्डवर जाऊन काम करणारे 64 कर्मचारी पैकी 17 कर्मचारी रिक्त असल्याने शिरूर तालुक्यातील गावाच्या अनेक शेतीच्या कामाचा मोठ्या प्रमाणात ताण इतर कर्मचारी यांच्या वर येत असून त्याचा त्रास तालुक्यातील शेतक-यांना होत आहे.तालुक्यातील करडे, टाकळी हाजी, चिंचोली, सविंदणे, आलेगाव पागा, इनामगाव, वडगाव रासाई, वढु बुद्रुक, कासारी,रांजणगाव गणपती या दहा गावात कृषी सहाय्यकच नाहीत. त्यामध्ये माजी आमदार पोपटराव गावडे व माजी आमदार अशोक पवार यांच्या गावात कृषी सहाय्यक ही पदे रिक्त आहे. तर इतर आठ गावचे काय?तर न्हावरे गावात मंडल कृषी अधिकारी पद रिक्त आहे.शिरूर तालुका कृषी कार्यालय मध्ये गेली वर्षापासून ही अनेक पदे रिक्त असून इतर कर्मचाऱ्यांवर याचा ताण होत आहे त्यामुळे यापुढील काळामध्ये कार्यालय बंद होईल का काही अशी भीती शेतकर्‍यांना वाटत आहे.

ही रिक्त पदे भरण्यासाठी अनेक वेळा शिरूर तालुका कृषी कार्यालय यांच्या वतीने पत्रव्यवहार केला आहे परंतु या पत्राना  अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी पुणे यांनी केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील कृषी विभाग रामभरोसे सुरू असून "आंधळं दळतय आणि..." अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

आर्थिक उत्पन्न वाढवावे शेतीमध्ये नवीन प्रयोग नवीन प्रकल्प या दृष्टीने शिरूर तालुका कृषी खाते काम करत आहे. तालुक्यात असणाऱ्या चे जमिनीची माहिती त्यामध्ये विविध हांगामामध्ये पेरणी ची माहिती ,केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती, शेतकऱ्याला देणाऱ्या पिक विमा तर रोजगार हमी योजना राबविणे ,शेतीमध्ये ठिबक सिंचन करणे,फळबाग लागवड, जलयुक्त शिवार योजना राबविणे, शेतकरी अपघात विमा, शेतकरी गट शेती करण्यास चालना, शेततळे करणे, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, अवजारे व यंत्र सामुग्री, ट्रॅक्टर देने, सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे,फळपीक योजना, अशा अनेक केंद राज्य सरकारच्या योजना ची माहिती शेतकर्याना देऊन त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळवून देऊन शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे काम करीत आहे.

या संदर्भात शिरुर कृषी विभागाचे प्रभारी अधिकारी सतीश केळगंद्रे यांनी माहिती देताना सांगितले कि, शिरूर कृषी कार्यालयामध्ये अनेक दिवसांपासून पदे रिक्त असून हि भरावीत म्हणून उपविभागीय कृषी कार्यालय राजगुरुनगर, जिल्हा अधिक्षक,कृषी संचालक यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरावी म्हणून पत्राद्वारे मागणी केली आहे. परंतु आजपर्यंत ही भरली गेली नाही. ही पदे लवकरात लवकर भरावी अशी मागणीही केली असल्याचे सांगितले.

याविषयी शेतकरी संघटनेचे बाळासाहेब घाडगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि,शिरूरचे कृषी कार्यालय हे तालुक्याला असून नसल्यासारखेच आहे जर कृषी कार्यालयात कर्मचारीच नसतील तर ती चालू कशाला हवीत, शासन या बाबत गंभीर नसेल तर शासनाचा निषेध.जिल्हा कृषी संचालक यांनी त्वरित ही पदे भरावीत अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल असे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या