...अन "या" रंगलेल्या फुगडीला उपस्थितांची दाद

विठ्ठलवाडी,ता.१२ जुलै २०१९(प्रतिनीधी) : शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे अन राज्याचे कामगार व मदत पुनर्वसन मंञी संजय उर्फ बाळा भेगडे यांच्यात रंगलेल्या फुगडीला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.

विठ्ठलवाडी(ता.शिरुर) येथे विठ्ठल मंदिरात पुजेनिमित्त राज्याचे कामगार व मदत पुनर्वसन मंञी संजय उर्फ बाळा भेगडे आले होते.यावेळी मंञी बाळा भेगडे यांच्या हस्ते श्रींची महापुजा पार पडली.तर शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते अभिषेक पार पडला.

यावेळी कार्यक्रमादरम्यान फुगडीसाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यानंतर आमदार बाबुराव पाचर्णे अन मंञी भेगडे यांनीही फुगडीचा आनंद घेतला.त्याला उपस्थितांनीही चांगलीच दाद दिली.यावेळी विविध क्षेञातील मान्यवर, अधिकारी वर्ग व भाजपाचे पदाधिकारी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.   

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या