तंबाखू व्यसनमुक्तीसाठी विद्यार्थ्यांना सामूहिक शपथ

Image may contain: one or more people, people sitting and people standingमांडवगण फराटा,ता.१४ जुलै २०१९(प्रतिनीधी) : मांडवगण फराटा येथील लोकनेते दादापाटील फराटे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत  तंबाखु व्यसनमुक्तीसाठी व व्यसनांपासून परावृत्त राहण्यासाठी सामूहिक शपथ घेण्यात आली.

या अभियानामध्ये महाविद्यालयातील २१४ विध्यार्थी आणि सहभागी झाले होते. व्यसनाचे मुलांना आकर्षण वाटते, पण व्यसन कोणत्याही स्वरूपात शरीरात गेल्यास त्याने शरीराची हानी होते,ती जीवघेणी ठरतात.या कार्यक्रमातून विध्यार्थ्यांना असा संदेश देण्यात आला की व्यसनांपासून दूर राहून जीवनाची सर्वांगीण प्रगती साध्य करण्याचा प्रयत्न मुलांनी करायला हवा.महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांनी शपथ घेऊन तंबाखूमुक्तीसाठी पुढाकार घेतला पाहिजे.व्यसनांचे दुष्परिणाम लक्षात घेतले पाहिजे.

मी आयुष्यासाठी वचनबद्ध आहे की, मी कधीही माझ्या आयुष्यात सिगारेट, बिडी, गुटखा, पान मसाला, हुक्का किंवा कोणत्याही तंबाखू उत्पादनास स्पर्श करणार नाही. मी माझ्या कुटुंबास, मित्रांना आणि माझ्या आसपासच्या इतरांना तंबाखू उत्पादनाच्या वापरापासून दूर राहण्यास प्रोत्साहित करेन अशी शपथ घेन्यात आली. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव पाटील फराटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील फराटे,सचिव मृणाल फराटे, प्राचार्य.डॉ.हेमंत व्ही.कांबळे, प्रा. विवेक सातपुते ,प्रा.अमोल पितळे, यांनी विशेष मार्गदर्शन केले.

या वेळी कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश ढोबळे,विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी सागर खरडे, प्रा.प्रविन चोळके,प्रा.राकेश वाणी, प्रा.अनिता नजन, प्रा.योगीता टेमक, प्रा.विशाल कोपनर,प्रा.मंगेश हरोळे,प्रा.विकास गडधे, प्रा.योगेश जोंधळे,प्रा.एस.झीटे,प्रा.एस.टोगे,प्रा.वर्षा खेडकर,प्रा.व्ही.पाचरने,प्रा.किर्ती रूपनवर, व इतर सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या