शिरुर नगरपरिषदेसमोर शैक्षणिक जागेसाठी अन्नत्याग

Image may contain: 6 people, people sittingशिरूर,ता.१५ जुलै २०१९ (प्रतिनिधी) : सर्वे नंबर११४० पैकी एक हेक्टर सरकारी जागेमध्ये शिरुर येथील कृषी लोक विकास संशोधन संस्थेला सन २००३ ला जागा द्यावी असा ठराव करुन सुद्धा तो ठराव सन २०१६ ला रद्द करण्यात आला.तसेच सन २०१० ला या जागेवर जाणुन बुजुन आरक्षण टाकुन संस्थेला जाणिवपुर्वक अडवणुक चालली असुन शिरुर नगरपरिषदेने विशेष सभा घेउन हे आरक्षण काढुन टाकावे अशी मागणी कृषी लोक विकास  संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी केली.

सर्वे नंबर११४० पैकी एक हेक्टर सरकारी जागेमध्ये शैक्षणिक उपक्रमाला तात्पुरती जागा द्यावी ,संडास बाथरूम उभारणी करिता जागा द्यावी व पाण्याचे कनेक्शन द्यावे या मागणीसाठी आज सोमवार (दि.१५) पासुन शिरूर नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर शिरुर येथील कृषी लोक विकास  संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी बेमुदत सत्याग्रही अन्नत्याग आंदोलन सुरु केले.

याबाबत माहिती देताना रवींद्र धनक यांनी सांगितले की, शिरूर नगरपरिषदेने सरकारी जागा सर्वे नंबर ११४० यापैकी काही जागा कृषीलोक विकास संशोधन संस्थेला जागा मिळावी म्हणून १४जुलै २००३ रोजी ठराव केला होता. ही जागा शैक्षणिक प्रयोजनाकरता विकास आराखड्यात आरक्षित करण्यात आली.तरीही या जागेतून रस्ता करण्याच्या विरोधात दिनांक २४मार्च २००८ रोजी पंधरा दिवसाचे आंदोलन करावे लागले. त्यावेळेस समाजसेवक अण्णा हजारे व तत्कालीन  जिल्हाधिकारी प्रभाकर देशमुख यांनी हस्तक्षेप करून रस्त्याचे काम थांबविले.नगरपालिकेने दिनांक १७ एप्रिल २०१० रोजी या जागेवर फळे व भाजीपाला मार्केटचे आरक्षण टाकले .सन२०१०पासून  आरक्षण काढावे म्हणून सर्व सनदशीर मार्गाचा आम्ही अवलंब केला, त्यानंतर शिरुर हवेलीचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिनांक ९मे २०१६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून नगरपालिकेने आरक्षण काढावे असे कळविले परंतु दिनांक ५ ऑक्टोबर २०१६रोजी लोकांनी निवडून दिलेल्या सेवकांना नगरसेवकांना विश्वासात न घेता या विषयावर जी चर्चा झाली नाही, ती ठरावात लिहून केलेला ठराव रद्द करण्यात आला. असा ठराव रद्द करण्यात आला, ज्याला सरकार व महसूल प्रशासनाची शिफारस असुनही या शैक्षणिक उपक्रमाला जागा देण्यात आली नाही.नगरपरिषदेच्या या धोरणामुळे सोळा वर्ष हा प्रश्न प्रलंबित असल्याची माहिती कृषी लोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक यांनी दिली.

यावेळी अॅड.सुभाष जैन यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत अन्नत्याग आंदोलन सुरु केले.यावेळी माजी नगराध्यक्ष नसीम खान, नगरसेवक मंगेश खांडरे, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महेबुब सय्यद, लोकशाही क्रांती आघाडीचे सचिव अनिल बांडे, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इक्बालभाई सौदागर, तारुअक्का पठारे, संपत लोखंडे, किसनराव जाधव, महम्मद हुसेन पटेल,खुशालबापु गाडे,समीर शेख, संजय बांडे, दिपक फलके, अप्पा वर्पे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या