शिक्रापुरला बसच्या धडकेत एकाचा मृत्यु

No photo description available.शिक्रापुर,ता.१७ जुलै २०१९(प्रतिनीधी) : शिक्रापुर येथे बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली.

या अपघातात संतोष निवृत्ती साठे(वय.३०,रा.साक्षाप्रिंपी,सध्या रा.सणसवाडी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.या प्रकरणी बाळु साठे यांनी शिक्रापुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,मयत संतोष साठे हा सणसवाडी येथील एसएमआर या कंपनीत कामाला होता.संतोष हा पत्नी शितल यांच्या सोबत गावावरुन परत येत असताना शिक्रापुरनजीक पुणे नगर महामार्गावर पाबळ चौकाजवळ आला असताना अज्ञात लक्झरी बस चा धक्का लागल्याने त्याची मोटारसायकल पुढे चाललेल्या एसटी बस ला एसटीबस ला उजव्या बाजुच्या मागील चाकाखाली जाउन संतोष याच्या डोक्यावरुन चाक गेल्याने तो जागीच मयत झाला तर पत्नी शितल या जखमी झाल्या.त्यांना तत्काळ स्थानिकांनी नजीकच्या खासगी दवाखान्यात उपचारांसाठी दाखल केले.अपघातानंतर सबंधित लक्झरी चालक निघुन गेला.

या प्रकरणी शिक्रापुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास शिक्रापुर पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या