शिरुरला खरिप आढावा बैठक संपन्न

Image may contain: outdoorशिरुर,ता.१८ जुलै २०१९(प्रतिनिधी) : सेंद्रिय शेती व वृक्ष लागवड व संवर्धन महत्वाचे असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते शिरुर येथे बोलताना म्हणाले.

पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती कृषि विभाग यांच्या वतीने तहसिल प्रशासकीय इमारतीतील हॉल मध्ये खरीप हंगाम सन २०१९-२० चा आढावा सभा आयोजित करण्यात आली होती.या वेळी देवकाते म्हणाले की मागील वर्षीच्या दुष्काळाची दाहकता पाहून सर्वांनी जागृत होणे गरजेचे आहे पाण्याचे नियोजना बरोबर वृक्ष लागवड व संवर्धन महत्वाचे आहे.जिल्हा परिषदेच्या सभापती सुजाता पवार यावेळी म्हणाल्या की शेतकऱ्यांना बी बियाण्याची उपलब्धता करुन देण्यात आली असून शेतकऱ्यांनी शेततळे व ठिंबक सिंचन योजनेचा लाभ घ्यावा.

सभेचे प्रास्ताविक कृषि आधिकारी  संजय बुधवंत यांनी केले. ते म्हणाले की तालुक्यात ब-यापैकी पाउस झाला.मागील वर्षी तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती.बाजरी,मूग,मका ची पेरणी तालुक्यात झाल्या आहेत.पाउस यंदा ब- या पैकी झाली आहे चांगल्या प्रकारच्या निविष्ठा देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.पॉस मशिनचे १४३ खत विक्रेत्यांना वाटप करण्यात आले आहे. सन २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषद निधीतून थेट हस्तातंरण योजनेअंतर्गत शिरुर तालुक्यातील ११६७ शेतकऱ्यांना एक कोटी १९ लाख ३५६१२ रुचा निधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

तालुका कृषि आधिकारी धनंजय हिवरे म्हणाले की,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी २ कोटी ३७ लाख रु चे अनुदान दिले असून जिल्हयात ठिंबक सिंचन योजनेसाठीचे हे सर्वाधिक अनुदान आहे. शेततळयासाठी एक कोटी ३७ लाख रुचे अनुदान शेतकऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.कृषि विकास आधिकारी अनिल देशमुख म्हणाले की, यंदा पाऊस उशिरा झाल्याने खरिप हंगामा आढावा सभाना उशिर झाला.जिल्हयासाठी शासनाकडे १ लाख ८५ हजार मेट्रीक खताची मागणी करण्यात आली होती.सध्या १ लाख ४९ हजार मेट्रीक टन खते उपलब्ध असून शिरुर तालुक्यात १००% बियाण्याचा पुरवठा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.हुमणी किडीला ला प्रतिबंध करणे आवश्यक आहे.जिल्हा परिषदेने शेतकऱ्यांसाठी हेल्पलाईन सुरु करावी अशी सूचना पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर यांनी केली.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा परिषदेच्या कृषि व पशुसंवर्धन समिती सभापती सुजाता पवार,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी आधिकारी नरसिंह मित्रगोत्री, पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहोकडे,कृषि विकास आधिकारी अनिल देशमुख,पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे,विक्रम पाचुंदकर,सविता प-हाड,अरुणा घोडे,आबासाहेब सरोदे,सहाय्यक निबंधक हर्षित तावरे आदी यावेळी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या