एमआयडीसीमधील कॉन्ट्रक्टवरून संरपंचाविरुद्ध गुन्हा

शिरूर, ता. 19 जुलै 2019 : रांजणगाव एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी धमकावल्याप्रकरणी एका गावच्या सरपंचाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

रांजणगाव एमआयडीसीमधील रिमोडिज ऍक्वा प्रा. लि. या कंपनीचे अधिकारी राहुल आनंद नार्लेकर यांनी कर्डेलवाडीचे सरपंच राजेंद्र तुकाराम दसगुडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, या सर्वांना पोलिसांनी अटक केली आहे.

कर्डेलवाडीचे सरपंच राजेंद्र तुकाराम दसगुडे हे आपले साथीदार रवींद्र रुपचंद फरगडे, गणेश बाळू ढेरंगे, राहुल भास्कर सोनावळे, सचिन जयवंत दसगुडे व आदिनाथ विष्णू निचीत कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मागण्याकरिता गेले होते. यावरून वादावादी झाली होती. लेबर कॉन्ट्रॅक्ट मिळविण्यासाठी धमकावल्याप्रकरणी नार्लेकर यांनी गुन्हा दाखल केला. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या